Video Shows Dog Blocked The Road : प्राणी आणि माणूस यांच्या नात्यातल्या नवनवीन गोष्टी सध्या आपल्यासमोर येत आहेत. माणसांच्या भावना समजून घेणारे प्राणी, प्राण्यांना मदतीचा हात देणारी माणसे, आईचा पाळीव प्राण्यांवरचा धाक, मानवांप्रमाणे सुख-सुविधांचा लाभ घेणारे पाळीव प्राणी, घरातील वस्तू नकळत तोडणारे श्वान, मांजर आदी अनेक गोष्टी माणसांनी प्राण्यांना आणि प्राण्यांनी माणसांना आपलेसे केले आहे याची उत्तम उदाहरणे दाखवून देत आहेत. आज सोशल मीडियावर एका हट्टी श्वानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडीओनुसार (Video) एक चारचाकी चालक त्याची गाडी चालवत असतो. तर, रस्त्याच्या मधोमध त्याला एक श्वान बसलेला दिसतो. अर्थात, गाडी आपल्यामुळे रस्त्यात थांबली आहे आणि आपण रस्त्यातून उठून बाजूला जाऊन बसावे याचे काहीच भान त्याला नसते. त्याला फक्त रस्त्याच्या मधोमध बसून राहायचे असते. ही गोष्ट एक चिमुकली पाहते आणि हट्टी श्वानाला रस्त्यातून बाजूला करण्याचा प्रयत्न करते. मग कुटुंबातील सदस्यांनी मिळून कशा प्रकारे श्वानाला रस्त्याच्या कडेला आणले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, श्वान रस्ता अडवून गाडीसमोर बसलेला आहे हे पाहून चिमुकली त्याला दोन फटके मारते आणि ‘रस्त्यावर झोपू नको’, असे हावभाव देत म्हणते आणि त्याचे दोन पाय पकडून, त्याला ओढत ओढत रस्त्याच्या कडेला आणते. पण, चपळ श्वान तिच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मग घरातील चिमुकला येतो आणि आणि श्वानाला ओढत रस्त्याकडेला आणतात. हे पाहून एक छोटा श्वान देखील मदत करताना दिसतो. हे सगळे पाहून चारचाकी चालकालासुद्धा हसू आवरले नाही आणि त्याने हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला.
मुलीचे हावभाव मस्त आहेत…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @trendruiners या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा पोट धरून हसताना दिसत आहेत. तिने ज्या प्रकारे श्वानाला ओढले, अरे यार…. मुलीचे हावभाव मस्त आहेत. ती श्वानाला शिकवत आहे- प्लीज रस्त्यावर झोपू नको, श्वानाने खरंच रस्ता अडवला आणि चिमुकले त्यांना रस्त्यातून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसत आहेत.