Viral Video Of Dog & Owner: माणूस व त्याचा श्वान यांच्यात अनोखे नातं असतं. श्वान किती प्रामाणिक व कृतज्ञ असतात याची आपण अनेक उदाहरणे आजवर पाहिली आहेत. रस्त्यावरील भटक्या श्वानाला उचलून आणून त्याला कुटुंबातील सदस्याचा सन्मान देणाऱ्या माणसाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण, हा मान-सन्मान पाहून श्वानदेखील त्या कुटुंबातील सदस्यांना आपलेसं करून घेतो. आज सोशल मीडियावर याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. मालक सुरेल आवाजात गाणं गात असतो तेव्हा श्वानदेखील त्याच्याबरोबर गाताना दिसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ (Video) श्वान व श्वानमालकाचा आहे. सोफ्यावर दोघेही बसले आहेत. तितक्यात श्वानमालक गाणं गाण्यास सुरुवात करतो. विनोद दोशी निर्मित व विजय आनंद दिग्दर्शित ‘ब्लॅकमेल’ (१९७३) या चित्रपटातील ‘पल पल दिल के पास तुम रहती हो‘ हे गाणं मालक गाण्यास सुरुवात करतो. हे गाणं तो इतकं सुरेल गातो की, श्वानदेखील त्याला साथ देण्यापासून स्वतःला थांबवू शकला नाही आहे. गाणं गाणाऱ्या मालकाला श्वानाने कशी साथ दिली ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा एकदा नक्की बघा..

हेही वाचा…रेल्वेस्थानकावर १५ ते २० रुपयांना मिळणारा वडापाव, समोसा खाताय? मग ते कसे बनवले जातात VIDEO तून बघाच…

व्हिडीओ नक्की बघा…

मालकाच्या सुरेल आवाजाला श्वानाची साथ :

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, ‘पल पल दिल के पास तुम रहती हो’ हे गाणं गाण्यास मालकानं सुरुवात केल्यावर काही वेळ श्वान शांतपणे ऐकत असतो. पण, नंतर अचानक श्वानसुद्धा त्याच्या स्टाईलमध्ये सूर जोडण्यास सुरुवात करतो आणि या गाण्याला एक आकर्षक वळण मिळतं. हे पाहून मालकाच्या चेहऱ्यावरही हसू येतं. अशी श्वान व श्वानमालक यांच्या गाण्याची मैफील आणखीन रंगते. तुम्ही आतापर्यंत अनेक गुरू-शिष्य, मित्र-मैत्रिणींना एकत्र गाताना नक्कीच पाहिलं असेल. पण, ही जोडी सगळ्यात वेगळी आणि हटके आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @waltthecolt व @sanjussongs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून गाणं गाणाऱ्या व्यक्तीचं तर कौतुक करीतच आहेत; पण श्वानानं त्याला दिलेली साथ पाहून भारावूनसुद्धा गेले आहेत. काही युजर्स श्वानाला ‘म्युझिक लव्हर’ म्हणतानासुद्धा दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर श्वान व श्वानमालकाच्या या जोडीची चर्चा रंगली आहे.