Viral Video Of Pet Dog : माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे तर प्राण्यांशीही नातेसंबंध जोडत असतो. आजकाल अनेकांच्या घरात पाळीव प्राणी असतात. कुटुंबातील सदस्य एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे प्रेम देतात, त्याचप्रमाणे या पाळीव प्राण्यावरही प्रेमाचा वर्षाव करत असतात आणि मग घरोघरी पाळले जाणारे हे पाळीव प्राणी आपल्या घरातील सदस्यच होऊन जातात. पण, काही घर मालक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होताना त्यांच्या पाळीव प्राण्यांना बरोबर घेऊन जातात, तर काही जण तिथेच सोडून जातात. तर आज हेच दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतो आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video) नोएडाचा आहे. एक अज्ञात व्यक्ती प्रवास करत असते. त्यादरम्यान रस्त्यावर अनेक गाड्या असतात. त्यात एक सामान वाहून नेणारा टेम्पो असतो. या टेम्पोत कुटुंबाचे सामान असते. घर स्थलांतरित करण्यासाठी सामान टेम्पोद्वारे घेऊन जात असतात. थंडी असल्यामुळे कुटुंबातील काही सदस्य अंगावर चादर घेऊन बसलेले असतात. यादरम्यान त्यांच्यात एक श्वानसुद्धा बसलेला दिसतो आहे, तर श्वानालाही थंडी वाजू नये म्हणून त्यांनी त्याच्याही अंगावर चादर ओढली आहे, हे पाहून अज्ञात व्यक्तीने या गोष्टीचा व्हिडीओ शेअर करून तिच्या भावना कॅप्शनमध्ये मांडल्या आहेत.
व्हिडीओ नक्की बघा…
https://www.instagram.com/reel/DD2EAr4Tdt3/?igsh=ODM1bHJ6c24wNmw%3D
इन्स्टाग्राम युजर @yogini_ms ने व्हिडीओ शेअर करत, ‘संध्याकाळी ग्रेटर नोएडामध्ये फिरताना हा सुंदर क्षण पाहिला. लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना नको त्या कारणास्तव सोडून देतात. पण, पाळीव प्राण्यासह घर स्थलांतरित करण्याचा हा सुंदर क्षण आज येथे अनुभवायला मिळाला. हा क्षण आपल्याला एक धडा शिकवतो की, आपण कोणत्याही गोष्टीची निवड केली तरीही आपल्याला हृदयापासून खरोखर काय आवडते त्याच गोष्टींना आपण प्राधान्य दिले पाहिजे’; अशी कॅप्शन या व्हिडीओला दिली आहे.
त्यांचा विश्वास कधीही तोडू नका
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Viral Video) @yogini_ms आणि @siuli_madhu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘विचित्र कारणांसाठी पाळीव प्राण्यांना रस्त्यात एकटे सोडून देणाऱ्या लोकांमध्ये व्हिडीओतील श्वानाला चांगले हृद असणारी माणसे मिळाली’; असा मजकूर व्हिडीओवर लिहिण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत आणि ‘तुमच्या पाळीव प्राण्यांना कधीही एकटे सोडू नका, त्यांना नेहमी तुमच्याबरोबर घेऊन जा, त्यांचा विश्वास कधीही तोडू नका’; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.