Video Shows Father And Daughter Love : लेक आणि वडिलांचे नाते हे जगातील सगळ्यात सुंदर नात्यांपैकी एक आहे. मोठेपणी मुलींना कायम त्यांच्या बाबांसारखा जोडीदार मिळावा, अशी इच्छा असते; तर मुलांना कायम एक गोंडस मुलगी जन्माला व्हावी, असे वाटत असते. त्यामुळेच की काय हे नाते काळ बदलला तरीही आजही तसेच आहे. तर, आज सोशल मीडियावर बाबा-लेकीचं नातं कसं असतं, हे दाखविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये एका आईने बाबा आणि लेकीचा खास क्षण कॅप्चर केला आहे…

व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला एक चिमुकली मांडी घालून बसलेली दिसते आहे. माहिरा @mahira_3647 या चिमुकलीच्या आईने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आईने माहिराच्या बाबांना जेवायला वाढलेले दिसते आहे. एकाच ताटात बाबा आणि लेक जेवताना दिसत आहेत. बाबा पोळीचा एक तुकडा लेकीसाठी तोडून ठेवतो आणि दुसरा पोळीचा तुकडा स्वतः खातो. बाबांच्या ताटात जेवणाऱ्या चिमुकलीचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mumbai Local Train Shocking Video viral
मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात नशेबाज तरुणाचा धिंगाणा, महिलांसमोर थुंकला अन् हातवारे करुन…; पाहा धक्कादायक VIDEO
Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
Image of Laurene Powell Jobs Maha Kumbh 2025 preparations
Steve Jobs’ Wife : “यापूर्वी इतक्या गर्दीच्या ठिकाणी…” महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीला ऍलर्जी
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

हेही वाचा…एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

व्हिडीओ नक्की बघा…

बाबा संध्याकाळी किंवा रात्री घरी आले की, त्यांच्याच कपातील चहात बिस्कीट बुडवून खाणे, त्यांच्या ताटात जेवणे आपल्यातील प्रत्येकाने नक्कीच केले असेल. तर, आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा तसेच बघायला मिळाले. टेबलावर बाबांचे ताट वाढलेले दिसते आहे. त्याच टेबलावर अगदी मांडी घालून बसलेली त्यांची चिमुकली त्यांच्याच ताटात जेवते आहे. बाबा एक घास लेकीला आणि एक घास स्वतःला अशा प्रकारे जेवताना दिसत आहेत. हे पाहून आईला भरून आले आणि तिने हा व्हिडीओ पोस्ट करण्याचे ठरवले. तसेच पोस्ट करीत ‘कसं सांगू? किती सुखं मिळतंय बघून’, अशी कॅप्शनदेखील व्हिडीओला देण्यात आली आहे.

हे सुख शब्दात सांगण्यासारखं नाही

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mahira_3647 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत. काय ती मांडी घालणे, काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे… ठार प्रेमात पडलो, आम्हालाही सुख मिळालं तुमचा हा व्हिडीओ बघून, सुख आणखी काय असतं ग…, हे सुख शब्दांत सांगण्यासारखं नाही. हे अनुभवलं की, माणूस काही क्षणांसाठी सर्व दुःख विसरून जातो आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत.

Story img Loader