Viral Video Shows Father Surprise Son : मुलाचे लहानपण सुखी व समृद्ध होण्यासाठी पालक अगदी मनापासून जीवतोड प्रयत्न करतात. सुरुवातीला एखादी वस्तू मागितली की पालकांकडून देण्याचा तोल सांभाळला जात नाही. मग ती वस्तू मिळेपर्यंत घरात धिंगाणा सुरु असतो. याचं एकमेव उदाहरण द्यायचं झालं तर सायकल. लहानपणी आपल्यातील अनेकांनी बाबांकडे सायकल घेण्यासाठी हट्ट नक्कीच केला असेल. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. बाबांनी चिमुकल्याला हटके सरप्राईज दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) नक्की कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, बाबांनी चिमुकल्याला एक खास सरप्राईज देण्याची योजना आखलेली असते. बाबा चिमुकल्याच्या डोळ्यावर एक पांढरा रुमाल बांधून त्याला घरी घेऊन येतात. चिमुकला उभा असतो त्याच्या बाजूला चादर झाकून एक वस्तू ठेवलेली असते. डोळ्यावरची पट्टी काढताच चिमुकला इकडे-तिकडे बघतो, तेव्हा त्याचे लक्ष चादर झाकून ठेवलेल्या वस्तूकडे जाते. चिमुकला उत्साहाने चंद्र काढतो, तितक्यात वरून रंगीबेरेंगी पताक्यांचे कागद पडतात. नक्की चादर झाकून ठेवलेली वस्तू काय असते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…“आईकडे एकच जागतिक उपाय”, गाडीवर बसून मस्ती करणारा मुलगा क्षणात कसा झाला शांत बघाच; VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

व्हिडीओ नक्की बघा…

बाबांचं प्रेम :

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, बाबांनी चिमुकल्यासाठी एक नवी-कोरी सायकल आणलेली असते. ही सायकल ते एका चादरीखाली झाकून ठेवतात आणि चिमुकल्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरात घेऊन येतात. घरात येताच चिमुकला डोळ्यावरची पट्टी काढतो, इकडे-तिकडे पाहतो. त्यानंतर चादर बाजूला काढतो तेव्हा सायकल पाहून थक्क होऊन जातो आणि बाबांना जाऊन मिठी मारतो व रडण्यास सुरुवात करतो; जे पाहून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल.

चिमुकल्याला रडताना पाहून बाबांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. त्यानंतर बाबा चिमुकल्याला सायकलवर बसण्यास सांगतात. तसेच या व्हिडीओतून असं दिसून येत आहे की, बाबा चिमुकल्याला सायकल कधी देणार या गोष्टीची तो खूप दिवसांपासून वाट बघत होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @ranjith_anitha_07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून काही जण भावुक झाले आहेत. तर अनेक जण त्यांच्या लहानपणीच्या आठवणी कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video shows father surprise son with new cycle after see this beautiful bond will you get emotional asp