Video SHows Brother Uses Polaroid Camera For Sisters Photoshoot : भाऊ आणि बहीण यांच्यातील नातं टॉम आणि जेरी या कार्टूनसारखे असते. एकमेकांशी ती दोघे भांडतात, एकमेकांवर रागावतात; पण दुसऱ्या क्षणाला एकमेकांशी गोड बोलण्यास सुरुवात करतात. त्यामुळे कालांतराने भांडण, रुसवेफुगवे, असे सगळे करत त्यांच्यातील नाते अधिक मजबूत होत जाते. आज सोशल मीडियावर या नात्याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. त्यामध्ये कॅमेरा हातात येताच चिमुकल्याने बहिणीचे खूप सुंदर फोटोशूट करण्यास सुरुवात केलेली दिसते आहे.
व्हायरल व्हिडीओ (Video) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधील आहे. आई, मॅडिसन मेली यांनी त्यांच्या पाच वर्षांचा मुलाच्या हातात नवीन पोलरॉइड कॅमेरा दिला. तेव्हा त्याने लहान बहीण नोराची छायाचित्रे क्लिक करण्याचा प्रयत्न केला. चिमुकल्या भावाने सुरुवातीला बहीण नोराबरोबर फेरफटका मारला आणि म्हणाला, “मी तुझे काही फोटो काढू शकतो का?” त्यावर बहीण नोरा “हो” म्हणाली. नोराने पोज देताच भाऊ म्हणाला, “तू सुंदर दिसत आहेस…” भावाने आपल्या बहिणीचे केलेलं फोटोशूट व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
हेही वाचा…आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
व्हिडीओ नक्की बघा…
लाडक्या बहिणीचे फोटोशूट
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, चिमुकला भाऊ त्याच्या लाडक्या बहिणीचे फोटोशूट करतो आहे आणि बहिणीला विविध पोज देण्यास सांगतो आहे. त्यानंतर त्यांचे बाबा मधेच बर्फ हवेत उडवून फोटोला नैसर्गिक इफेक्ट्ससुद्धा देत होते. त्यानंतर त्यांची आईसुद्धा फोटोशूटमध्ये सामील झाली. थोड्या वेळाने त्यांनी फोटो पाहिले आणि ते थक्क झाले. कारण- पाच वर्षांच्या चिमुकल्याने खरोखरच खूप सुंदर छायाचित्रे कॅप्चर केली होती, जी तुमचीही मने जिंकून घेतील एवढे तर नक्की…
फोटोशूटदरम्यान भाऊ आणि बहिणीचा संवाद तुम्ही व्हिडीओवर असणाऱ्या सबटायटलद्वारे इंग्रजीमध्ये वाचू शकता. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @yashbarde55 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच आईने व्हिडीओला कॅप्शन दिली आहे की, ‘तुमच्या पाच वर्षांच्या मुलाला नुकताच एक पोलरॉइड कॅमेरा मिळाला आणि अशा प्रकारे त्याने त्याचा उपयोग केला’ … नेटकऱ्यांनासुद्धा हे फोटोशूट आवडले असून, ते विविध प्रकारच्या कमेंट्स व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.