Video Shows Animal Themed Wedding : प्राणीप्रेमी असणारे अनेक जण त्यांच्या आवडीनुसार घरात विविध प्राणी पाळतात. मांजर, कुत्रा, कासव, ससा आदी अनेक प्राण्यांना आवडीने घरी घेऊन येतात आणि त्यांची काळजी घेतात. घरात राहणारे पाळीव प्राणी कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच असतात, त्यामुळे घरातील कोणताही कार्यक्रम असेल तर ते पाळीव प्राण्यांनासुद्धा नवनवीन कपडे शिवून त्यांनासुद्धा स्वतःच्या आनंदात सहभागी करतात. पण, आज सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे. यामध्ये आजारी, जखमी आणि विशेष गरज असलेल्या प्राण्यांना आश्रय आणि काळजी देणारी डेहराडून स्थित ‘साथी’ ( Founder Of Healing Saathi) ची संस्थापक मुग्धा खत्रीने तिच्या लग्नात पाळीव प्राण्यांसाठी काहीतरी खास केलं आहे.
मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये (Video) देव, कुटुंब आणि तिच्या मित्रांच्या आशीर्वादाबरोबर प्राण्यांचेही प्रेम घेतले. लग्नमंडपात जाताना नवरीच्या वर धरल्या जाणाऱ्या चादरवर तिने मांजर आणि श्वानाच्या पंजाचे ठसे उमटवून घेतले. पंजाबी लग्नात नवरीला कलीरा (kallira) घालणे खूप शुभ मानले जाते, तर मुग्धानेसुद्धा मांजर आणि श्वानाच्या चेहऱ्याचा व नावाचा कलीरा बनवून घेतला आहे. एवढेच नाही तर तिने ज्या पहिल्या श्वानाला रस्त्यावरून उचलून आणून वाचवले होते, तो टार्झन साखरपुड्याची अंगठी घेऊन तिच्यापर्यंत आला. एकदा पाहाच नवरीचा हा खास व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
पाळीव प्राण्यांवरचे प्रेम…
तुम्ही आतापर्यंत घोडा किंवा बैलगाडीवरून वरात मंडपापर्यंत आणलेली पहिली असेल. पण, या नवरीने तिच्या लग्नाच्या दिवशी सात वचनांमध्ये आणखीन एक वचन जोडले आहे. तिने आपल्या लग्नात रस्त्याकडेला असणाऱ्या प्राण्यांना सुद्धा खास स्थान दिले आहे. फक्त चांगले कपडे घालूनच नाही तर मुक्या प्राण्यांचा आशीर्वाद घेऊन तिने आपल्या नवऱ्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे. जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि तुम्ही नवरीचे कौतुक कराल एवढे तर नक्कीच…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @mugdha_khatri इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘माझ्या आयुष्यातील नव्या सुरुवातीसह मी मुक्या प्राण्यांना त्यांचा संभाळ करण्याचे वचन आणखीन मजबूत केले आहे’; अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून नवरी मुक्ताचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे, जो पाहून तुम्हीही नक्कीच भावूक व्हाल.