Video Shows Singer & Beatboxer : अमृता खानविलकर – आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वच चर्चेत आले आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादसुद्धा मिळाला. आपल्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री अमृता खानविलकरच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील चंद्रा या बहारदार लावणीने तर प्रत्येकाला वेड लावले. आजही सोशल मीडियावर विविध कार्यक्रमांत या कार्यक्रमाची क्रेझ पाहायला मिळते आहे. पण, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये चंद्रा या गाण्यावर डान्स किंवा लावणी न करता एक खास सादरीकरण करण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. इन्स्टाग्राम युजर हर्षाली व प्रांजल एका कार्यक्रमात उत्तम सादरीकरण करताना दिसत आहेत. दोघींच्याही हातात माईक असतो. या दोन्ही तरुणींपैकी एक तरुणी चंद्रमुखी या चित्रपटातील ‘चंद्रा’ गाण्याची सुरुवात ‘विझला कशानं सख्या सजणा सांगा लुकलुकणारा दिवा’ या बोलांनी करते. त्यानंतर मग दुसरी तरुणी सगळ्यांनाच थक्क करून सोडते. तरुणीनं चक्क या लावणीला बीट बॉक्सिंगची साथ दिली आहे. दोन्ही तरुणींची जुगलबंदी व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
हेही वाचा…भाऊ असावा तर असा! नोराने दिली पोझ, भाऊ म्हणाला सुंदर…; पाहा प्रेमळ फोटोग्राफरचा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा…
बीट बॉक्सिंगच्या बिट्सवर लावणी
बीट बॉक्सिंग हा हिप हॉप संस्कृतीतील एक कलाप्रकार आहे. भारतासह जगभरात ही कला अनेक कलाकार जपतात. आज व्हायरल व्हिडीओतील एका तरुणीनं तिची बीट बॉक्सिंग ही कला सादर केली आहे. तिनं लावणीला आधुनिक बीट बॉक्सिंगची जबरदस्त साथ देऊन लावणीच्या ठेक्याला नवा अंदाज दिला आहे; जो ऐकून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल आणि हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल. आतापर्यंत तुम्ही ढोलकी, पेटी किंवा आणखी इतर वाद्यांच्या तालावरील लावणी सादर केल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण, बीट बॉक्सिंगच्या बीट्सवर लावणीचं सादरीकरण क्वचितच पाहिलं असेल.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @harshaliii_k आणि @whopranjal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘लावणी X बीट बॉक्स’ (Lavani X Beatbox), अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. ‘दोघीनींही अप्रतिम सादरीकरण केले आहे, खूप मस्त’ आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर अभिनेत्री अमृता खानविलकरसुद्धा व्हिडीओ पाहून इम्प्रेस झाली आहे आणि तिने ‘वॉव’ (Wow), अशी कमेंट केली आहे.