Viral Video Shows Elderly Couple Love : कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल, तर तिची तब्येत ठीक होईपर्यंत घरातील प्रत्येक सदस्याला तिची चिंता करत असतो. कुटुंबातील सदस्यांना स्वतःसह रुग्णालाही धीर द्यावा लागतो. रुग्णांबरोबरच कुटुंबातील सदस्यांना हॉस्पिटलमधील महागडी बिले भरताना आर्थिक संकटाला आणि रुग्णांना होणारा त्रास पाहून भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच यादरम्यान रुग्णांना घरातील सदस्यांपासून ते नातेवाईक, मित्र-मैत्रिणी भेटायला हॉस्पिटलमध्ये येतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्या बायकोला बघायला आलेल्या आजोबांना अश्रू अनावर झाले आहेत.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) हॉस्पिटलचा आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला आजी-आजोबा दिसत आहेत. आजी आजारी असते, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले असते. हॉस्पिटलमध्ये आजी बेडवर झोपलेली असते तर आजोबा बेडपाशी टेबलावर बसलेले असतात. आपल्या आजारी बायकोला बेडवर गुपचूप झोपलेलं पाहून आजोबा भावूक होतात. दोघंही संवाद साधत असतात तितक्यात आजोबांना अश्रू अनावर होतात आणि ते रडण्यास सुरुवात करतात. नक्की काय घडतं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…५० रुपयांत पोटभर जेवण देणारे आजी-आजोबा; थरथरत्या हाताने ग्राहकांना वाढतात जेवण, पाहा प्रेमळ VIRAL VIDEO

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/DAxNY0TN-9_/?igsh=ZWJlaTlnM3E1ZHo%3D

उगाच कोण कोणासाठी रडतं नसतं…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, आजीला बेडवर गपचूप पडलेलं पाहून आजोबा रडण्यास सुरुवात करतात. आजोबांना रडताना पाहू आजी त्यांना सावरण्यासाठी मायेने हात फिरवते. पण, आजीला बरं नाही आहे हे लक्षात ठेवून आजोबा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आजोबांना रडताना पाहून बेडवर झोपलेल्या आजी देखील रडू लागतात. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती सामान्यतः आपल्याला आवडतेच. पण, आपल्या आवडत्या व्यक्तीला दुःखात पाहून आपल्यालाही रडू कोसळते,याचे उदाहरण या व्हिडीओत पाहायला मिळाले.

सोशल मीडियावर @uturaj_edits_0729 हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला ‘उगाच कोण कोणासाठी रडतं नसतं, अश्रू तेव्हाचं येतात जेव्हा प्रेम खरं असतं’ ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून भावूक होत आहे आणि डोळ्यात पाणी येणाऱ्या इमोजीसह कमेंटमध्ये त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. एकूणच या प्रेमळ व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.