Video of emotional reunion goes viral : आयुष्यभर साथ देणारे मित्र फार कमी लोकांना भेटतात. आयुष्यात कितीही संकट आले तरी साथ सोडत नाही तो खरा मित्र असतो असंही म्हणतात. पण, असे मित्र मिळण्यासाठी खरोखरचं भाग्य लागते. नाही तर अगदी छोट्या-छोट्या कारणांवरून बोलणं देखील बंद करणारे अनेक जण असतात. पण, काही जण आयुष्यभर ही नाती टिकवायला तयार असतात. अशाच आयुष्यभर नातं जपणाऱ्या एका मैत्रिणींच्या ग्रुपचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये जवळजवळ ५० वर्षानंतर त्यांची भेट झाली आहे. नक्की कशाप्रकारे ही भेट झाली, ही भेट कोणी घडवून आणली बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनिश भगतच्या आजीला फुफ्फुसाच्या समस्यांमुळे काही दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यादरम्यान आजीच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी नातवाने तिच्या इच्छांची एक यादी (विशलिस्ट) तयार केली. या यादीत जुन्या मैत्रिणींना भेटण्याची इच्छा होती. आजी तिच्या मैत्रिणींना जवळजवळ ५० वर्ष भेटली नव्हती. काही दिवसांनी आजी बरी होऊन घरी आल्यानंतर नातवाने शोध सुरु केला आणि आजीच्या मैत्रिणीचा नंबर शोधून, त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर बंगळुरूमधील आजीच्या मैत्रिणीच्या घरी रियुनियनसाठी सरप्राईज ठेवण्याची योजना आखली. नक्की पुढे काय घडलं व्हायरल व्हिडीओतून ( Video) तुम्हीसुद्धा बघा…

two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक
Interesting story of father-son relationship Shri Ganesha movie Milind Kavade
बापलेकाच्या नात्याची रंजक गोष्ट
Grandfather expressed his love To Grandmother
‘आमचं आय लव्ह यू…’ आजोबांनी हटके स्टाईलमध्ये प्रेम केलं व्यक्त; आजी लाजल्या अन्…, पाहा Viral Video

हेही वाचा…VIDEO: धुळीने माखलेला पंखा स्वच्छ करायची सोपी ट्रिक, हात न लावता होईल साफ; महिलेचा जुगाड पाहून नेटकरी म्हणाले, ‘आतापर्यंत दोन…’

व्हिडीओ नक्की बघा…

चौघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली :

व्हायरल व्हिडीओत ( Video) तुम्ही पाहिलं असेल की, नातू आजीला विमानातून बंगळुरूला घेऊन जातो. त्यानंतर अखेर ते आजीच्या मैत्रिणीच्या घरी पोहचतात. खूप वर्षांनी बघितल्यामुळे आजी मैत्रिणीला ओळखत नाहीत आणि स्तब्ध होऊन, नमस्कार करत घराच्या आतमध्ये जातात. ‘अरे हात का जोडतेस’ असं आजीची मैत्रीण म्हणते आणि मग आजीला समोर कोण आहे हे लक्षात येते आणि ती लगेच मैत्रिणीला घट्ट मिठी मारते आणि ‘एवढ्या वर्षांनंतरही तू खूप सुंदर दिसतेस’ असं म्हणते.

हा क्षण आणखीन जादुई झाला जेव्हा आणखीन दोन मैत्रिणी बेडरूममधून बाहेर आल्या आणि चौघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली. चौघी त्यांच्या बालपणीचे दिवस, त्यांच्या सुंदर आठवणी एकमेकींना सांगताना दिसल्या आणि हा दिवस आजीसाठी खूप खास ठरला. त्यानंतर चौघी मैत्रिणींनी केक कापला,डान्स केला आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ @anishbhagatt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी देखील आलं आहे आणि असं खास रियुनियन आपल्याही आयुष्यात व्हावं अशी इच्छा मांडताना ते कमेंटमध्ये दिसत आहे.

Story img Loader