Video Shows cat saves another cat : लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जातं की, संकटात असणाऱ्या व्यक्तीला किंवा गरजूंना नेहमी मदत करावी. माणसं माणसांची मदत करतात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण, आज एका प्राण्यानं दुसऱ्या संकटात सापडलेल्या प्राण्याला मदत केली आहे. अनेकदा अन्न-निवाऱ्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या, एकमेकांवर हल्ला करणाऱ्या, तर कधी शिकार करणाऱ्या प्राण्यांची आज वेगळी झलक पाहायला मिळाली आहे. एका मांजरीवर चार श्वान हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. तितक्यात दुसरी मांजर येऊन अगदी धाडसाने त्या श्वानांच्या विरोधात लढताना दिसते आहे.

व्हायरल व्हिडीओत ( Video) तुम्ही पाहिलं असेल की, चार श्वान एका मांजरीकडे हळूहळू धावत येतात. त्यावेळी ती मांजर एका झाडाची मदत घेऊन स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण, श्वान मांजरीजवळ जाऊन तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हे पाहून एक दुसरी मांजर त्या चार हल्लेखोर श्वानांविरोधात लढण्यासाठी उभी राहते आणि पहिल्या मांजरीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करते. नक्की काय घडलं? दुसरी मांजर पहिल्या मांजरीला वाचवण्यात यशस्वी ठरली का? व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…VIDEO: लग्नाला यायचं हं! कीबोर्ड, गूगलमॅप अन्… पोलिस अधिकाऱ्याची ‘ॲपल थीम’ लग्नपत्रिका एकदा पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

चारही श्वान हुशार मांजरीपुढे नतमस्तक झाले :

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, एका मांजरीवर चार श्वान हल्ला करणार असतात, तितक्यात दुसरी एक मांजर हे दृश्य पाहते आणि ते चारही हल्लेखोर श्वान उभे असलेल्या जागेवर ती मांजर उडी घेते. ती प्रत्येकाच्या अंगावर धावत जाऊन, अगदी नखंसुद्धा मारते. यादरम्यान पहिली मांजर स्वतःचा जीव वाचवून पळ काढते. त्यानंतर बघता बघता ती बचावासाठी आलेली दुसरी मांजर त्यांना चकवा देण्यास सुरुवात करते आणि झाडा-झुडपांमधे उडी घेते. त्यानंतर दुसऱ्या दिशेने बाहेर पडून श्वानांना फसवण्यात यशस्वी होते परंतु हल्ला करण्यास आलेले चारही श्वान त्या हुशार मांजरीपुढे नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @CuriousWanderer567 या Reddit वरून शेअर करण्यात आला आहे. युजर्सनी व्हिडीओच्या कमेंट्समध्ये वीर मांजरीची प्रशंसा केली. “मी मांजरीला एकाच वेळी अनेक श्वानांचा सामना करताना पाहिले नाही”, “शूर वीर मांजर”, “दुसऱ्या मांजरीला प्रामाणिकपणे मदत करणारी मांजर तुम्ही आजवर पाहिली नसेल”, “मोठी मांजर लहान मांजरीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे” आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे पाहायला मिळत आहे.