Video Shows On Rose Day Husband Plan Surprise For Wife : लग्नानंतर जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे एकमेकांना पाहिजे तसा वेळ देणे शक्य नसते, प्रेमाच्या सुंदर क्षणांच्या जास्त संधी मिळत नाहीत. कारण- वेळ त्याला परवानगी देत नाही, असे अनेक जण अगदी सहज म्हणून जातात. पण, काही जोडीदार असे असतात की, ते प्रत्येक क्षण खास करण्याच्या प्रयत्नात असतात. सध्या ‘व्हॅलेंटाइन वीक’ सुरू आहे. व्हॅलेंटाइन वीकमधला पहिल्या दिवशी रोझ डे साजरा केला जातो. या दिवशी जोडपी आपल्या जोडीदाराला गुलाबाचं फूल देतात आणि आपल्या मनातली भावना व्यक्त करतात. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आई आणि लेक मार्केटमध्ये गेलेले असतात. यादरम्यान बाबा आणि त्यांचा मुलगा आईसाठी खास सरप्राईज प्लॅन करतात. घरात हॉलमध्ये काही चिप्सची पाकिटे आणि बॉक्समध्ये एक पेस्ट्री नेऊन ठेवतात. दरवाजाची बेल वाजते आणि त्यानंतर घरातील लाईट बंद केली जाते. बाबा दरवाजाच्या मागे उभे राहतात आणि मुलगा फोनमध्ये व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात करतो. आई घरात येते आणि बाबा कसे सरप्राईज देतात ते व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, आई आणि तिची लेक सामान घेऊन मार्केटमधून घरी येतात. ‘राँझना हुआ मैं तेरा’ गाणे वाजण्यास सुरुवात होते आणि आई घरात येताच बाबा गुडघ्यावर बसून तिला फूल देतात. त्यानंतर मुलगी या आनंदात डान्स करण्यास सुरुवात करते. तर, आई-बाबांचा तो रोमँटिक क्षण खराब होऊ नये म्हणून भाऊ (मुलगा) आपल्या बहिणीला ‘अगं, जाडी बाजूला हो’ असे म्हणतो. त्यानंतर मुलगी नाचत नाचतच बाजूला होते. त्यानंतर बाबा आईबरोबर डान्स करतात, पेस्ट्री कापतात आणि ‘रोझ डे’ सेलिब्रेट करतात.

कोणाची नजर नको लागू देत…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @inder.bisht19 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा भारावून गेले आहेत. मुलगा सिनेमॅटोग्राफर आणि मुलगी डान्सर असेल तर चिंताच नाही, कोणाची नजर नको लागू देत, मुलगी घरात येते आणि तिच्या वडिलांच्या हातात गुलाब बघते, आनंदाने नाचू लागतो भाऊ तिला मोटी बाजूला हो असे म्हणतो, हे सगळे पाहिल्यावर हे खूप आनंदी घर आहे, असे वाटते आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video shows husband plan surprise for wife on propose day daughter started dancing and son make cinematographer on parents special day asp