Video Shows Indian Railway Employee Throwing Garbage From Train : सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच ट्रेन, बसस्थानक, थिएटरमध्ये, उद्याने, तर ट्रेन प्रवास करतानासुद्धा आपण अनेक पदार्थ खातो किंवा कोल्ड्रिंक्सचे सेवन करतो. खाण्याला कोणतेही बंधन नसले तरीही आपला कचरा आपली जबाबदारी हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण, ही जबाबदारी किती जण योग्यरीत्या पार पाडतात? कारण- आपल्यातील बरेच जण या खाद्यपदार्थांचा कचरा इथे-तिथे फेकून देतात आणि इतरांना त्याचा त्रास होतो. पण, हेच कृत्य आता रेल्वे कर्मचारी करायला लागले, तर त्यांना कोण जाब विचारणार?

आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये दोन प्रवाशांसमोर रेल्वेचा कर्मचारी (On Board Housekeeping Service) कचराकुंडीत कचरा उचलून रुळांवर फेकत आहेत. प्रवासी रेकॉर्डिंग करताना म्हणतो आहे, “हे काका सर्व कचरा रुळांवर फेकत आहेत. ही भारतीय रेल्वेची अवस्था आहे. वरिष्ठ कर्मचारी रुळांवर कचरा फेकत आहेत”. हे ऐकूनसुद्धा कर्मचाऱ्याने कचराकुंडीतील सर्व कचरा, खाली पडलेला कचरा पायांनी सरकवत धावत्या ट्रेनमधून रुळांवर फेकून दिला. पण, यादरम्यान तो कर्मचारी प्रवाशाला काय म्हणतो की, हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा.

व्हिडीओ नक्की बघा…

https://twitter.com/moronhumor/status/1897484186987966529

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, प्रवासी रेकॉर्ड करतानादेखील कर्मचारी हसून ”मग भरलेली कचरापेटी खाली तरी कुठे करणार”, असे म्हणताना दिसला आहे; जे पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त होतो आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीनेसुद्धा भारतीय रेल्वेने या अधिकाऱ्याला ताबडतोब शोधून निलंबित करावे. शिक्षा म्हणून त्याला रेल्वेस्थानकावर बोलावून प्लॅटफॉर्म साफ करायला आणि रुळांवरून कचरा उचलायला लावावा. ‘हा कर्मचारीच खरा कचरा आहे’, अशी कॅप्शन त्याने व्हिडीओला दिली आहे.

त्यांना काढून टाकण्यात आले…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) पाहून भारतीय रेल्वेच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून याबद्दलची अपडेट दिली गेली आहे आणि, “आपल्या भारतीय रेल्वेमध्ये कचरा विल्हेवाटीसाठी एक सुव्यवस्थित यंत्रणा आहे. ज्या OBHS कर्मचाऱ्यांनी त्याचे उल्लंघन केले होते, त्यांना काढून टाकण्यात आले आहे आणि त्यांच्यावर मोठा दंड आकारण्यात आला आहे. त्याशिवाय गाड्या आणि रेल्वे परिसराची योग्य स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा नेमून दिले जाते”, अशी कमेंट केली आहे.

Story img Loader