Viral video of Ganesh Chaturthi celebrations : यंदा ७ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार असून सगळीकडे उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मुर्तींचे आगमन झाले असून घरच्या बाप्पासाठी मात्र अजून सजावटीचे काम सुरु आहे. टाळ, डीजे, ढोल पथक, तर गणपती बाप्पा मोरया असे मोठमोठ्याने म्हणत आपण हातगाडी, टेम्पोवरून बाप्पाला घरी घेऊन येतो. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही चिमुकली मंडळी बाप्पाचे अगदी खास पद्धतीत स्वागत करताना दिसले आहेत.

व्हायरल व्हिडीओ ( Video) कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, काही चिमुकली मंडळी बाप्पाचे स्वागत करताना दिसले आहेत. रस्त्याच्या मधोमध एक सायकल उभी आहे. सायकल वर एक पुठ्ठयाचा बॉक्स ठेवला आहे. या बॉक्समध्ये दोन छोट्या गणपतीच्या मुर्त्या ठेवण्यात आल्या आहेत आणि सायकलच्या मागच्या सीटवर आरतीचे ताट सुद्धा ठेवले आहे. चिमुकल्यांनी बाप्पाच्या आगमनासाठी कसं खास स्वागत केलं आहे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच

हेही वाचा…VIDEO: असा वाढदिवस होणे नाही! ग्राहकाने दरवाजा उघडताच गाणं वाजलं अन्… डिलिव्हरी बॉयने अनुभवला आनंदाचा क्षण!

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओ पाहून बालपण आठवेल :

तुमच्यातील अनेकांना हा व्हिडीओ (Video) पाहून स्वतःचे बालपण नक्कीच आठवलं असेल. चाळीतल्या किंवा बिल्डिंगमधल्या मित्र-मैत्रिणींना एकत्र बोलावून, घरातील शो-पीसची एखादी बाप्पाची मूर्ती आणून अगदी नाटकी स्वरूपात पण खऱ्या भावनांनी बाप्पाचे आगमन अशाच पद्धतीने केले जायचे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, गाणं सुरु होताच काही चिमुकली दिसू लागतात. हे बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालेले दिसत आहेत. त्यांनी सायकलवर बाप्पासाठी छोटासा बॉक्स देखील ठेवला आहे. कोणताही डीजे, किंवा बँजो न वाजवता अगदी साध्या पद्धतीत चिमुकल्यांनी बाप्पाला बॉक्समध्ये विराजमान केलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर या गोष्टीचा आनंद देखील दिसतो आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘पैसा नाही फक्त मनात श्रद्धा पाहिजे…’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तेथे उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने हे पाहिलं आणि हा व्हिडीओ स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना देखील त्यांच्या लहानपणीचे दिवस आठवले आहेत व ते विविध शब्दात या व्हिडीओचे कौतुक करताना दिसत आहेत.

Story img Loader