Video shows Lady Dancing On Her Flat On Yei Ho Vitthale music band : एखादं गाणं वाजलं की, त्यावर ठेका धरणारे अनेक जण असतात. फक्त गाण्याची धून जरी ऐकू आली तरीही काही जणांचे पाय आपोआप थिरकतात, गाणं गुणगुणण्यास सुरुवात करतात, तर अनेक जण उभं राहून डान्स करू लागतात. यंदा गणेशोत्सवादरम्यान तुम्ही बाप्पाच्या आगमन व विसर्जनादरम्यान अशी अनेक मंडळी पाहिली असतील. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये रस्त्यावर बॅन्जो पथक एका गाण्याची धून वाजवत असते. या धूनवर एक महिला फ्लॅटमध्ये डान्स करताना दिसून आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Video) मुंबईतील लोखंडवालामधील आहे. हा व्हिडीओ बाप्पाच्या आगमनाचा की मिरवणुकीचा आहे हे स्पष्ट होत नाही आहे. पण, रस्त्यावर बॅन्जो पथक ‘येई हो विठ्ठले’ची धून वाजवत आहेत. तसेच अनेक जण या धूनवर ठेका धरून नाचताना दिसत आहेत. पण, या सगळ्यात एका महिलेने लक्ष वेधून घेतले आहे. कारण- ही धून ऐकून फ्लॅटमधील एका महिलेने डान्स करण्यास सुरुवात केली आहे. महिलेने कशा प्रकारे डान्स केला ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…मार्केटमध्ये भाजी आणायला जाताय? IFS अधिकाऱ्याच्या पत्नीने दिली ‘ही’ यादी; PHOTO चा तुम्हाला फायदा होईल का बघा

व्हिडीओ नक्की बघा…

येई हो विठ्ठलेच्या धूनवर मनोसोक्त डान्स :

घराच्या बाजूला एखादा कार्यक्रम असेल आणि तेव्हा मोठमोठ्याने गाणी लावली गेली असतील. तर त्यातील एखादे गाणे ऐकून आपणसुद्धा डान्स करण्यास सुरुवात करतो. अगदी बेधुंद होऊन, कोणतीही चिंता मनात न ठेवता, कोण आपल्याकडे बघतंय का याची पर्वा न करता केलेल्या डान्सला आपण सगळेच ‘गणपती डान्स’ म्हणतो. तर याची एक उत्तम झलक या व्हिडीओतून (Video) पाहायला मिळाली आहे. त्या व्हिडीओतील महिला ‘येई हो विठ्ठले’च्या धूनवर अगदी आनंदाने मनसोक्त नाचताना दिसली आहे.

तेथे उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने हे खास दृश्य पाहिले आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला. त्यानंतर अंधेरी लोखंडवाला ओशिवरा सिटिझन असोसिएशनने पोस्ट केलेली ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली; जी आज @Mumbaikhabar9 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच ‘येई हो विठ्ठले’च्या धूनवर महिलेचा डान्स, अशी कॅप्शन या व्हिडीओला ( Video) देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून एका युजरने कमेंट केली आहे की, अशा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतला पाहिजे. तर, अनेक जण या व्हिडीओचे विविध शब्दांत कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video shows lady dancing on yei ho vitthale in her flat on music of band playing in the street watch amazing video asp