Viral Video : यंदा ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरपर्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. घरचा गणपती असो वा सार्वजनिक गणपती दहा दिवस बाप्पाची सेवा कशी करता येईल याकडे सर्वांचे लक्ष असते. मग या दिवसांमध्ये भाविकांना प्रसाद वाटायचा, रात्रभर बाप्पांसाठी जागं राहून त्यांची देखरेख करायची आदी अनेक गोष्टींचा यात समावेश असतो. तर आज याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चिमुकला बाप्पाची सेवा करून एवढा दमला की, त्यांच्या बाजूलाच झोपी गेला आहे.

लहान मुलांना प्रसाद वाटण्याची खूप आवड असते, त्यामुळे मंडप असो किंवा घर; ते बाप्पाच्या जवळच ठाण मांडून असतात. तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ सार्वजनिक गणेश मंडळाचा आहे. बाप्पाची मूर्ती मंडपात स्थापन केली आहे, तसेच स्टेजवर एक चिमुकला खुर्चीवर बसला आहे. बाप्पाच्या जवळ बसलेला हा चिमुकला बसल्या-बसल्या झोपी गेला आहे. बाप्पाच्या सेवेत थकलेल्या या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ ( Video) एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting
पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

हेही वाचा…रस्त्यावर ‘येई हो विठ्ठले’ची धून अन् फ्लॅटमधील महिलेचा डान्स; लोखंडवालातील व्हायरल VIDEO एकदा बघाच

व्हिडीओ नक्की बघा…

बाप्पाच्या जवळच निजला…

सकाळी लवकर उठून मंडपाची स्वच्छता करणे, आदल्या दिवशीचा मूर्तीवरील हार काढून नवीन हार घालणे, मंडपात येणाऱ्या प्रत्येक भक्तांना प्रसाद वाटप करणे, रात्री देखभाल करून उशिरा झोपून सकाळी लवकर उठणे या सगळ्यात झोप व्यवस्थित पूर्ण नाही होत. पण, या दिवसांमध्ये अशा कोणत्याच गोष्टीचा फरक आपल्याला पडत नाही. पण, एका चिमुकल्याला मात्र त्याची झोप आवरली नाही. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, बाप्पाच्या मूर्तीजवळ खुर्ची ठेवून एक चिमुकला बसला आहे आणि बसल्या-बसल्या तो दमला व झोपी गेला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @kasturi_bajad_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘दहा दिवस बाप्पाची सेवा करून थकलेला चिमुकला सेवक बाप्पाच्या निरोपदिनी, बाप्पाच्या जवळच निजला’; अशी व्हिडीओला कॅप्शन देण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी दर्शनास आलेल्या भक्ताने हा क्षण पाहिला आणि व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकाऱ्याने, ‘ही सेवा पुढे आशीर्वादस्वरुपी पुन्हा बप्पा देतो’; अशी कमेंट केली आहे.