Video Shows Little boy mimics Rajpal Yadav : बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव आज इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. त्यांच्या कॉमेडीचे आज हजारो चाहते आहेत. ‘भूल भुलैया’, ‘अपना सपना मनी-मनी’, ‘फिर हेरा फेरी’, ‘हंगामा’, ‘खट्टा मिठा’ आदी अनेक चित्रपटांतील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या चित्रपटातील अनेक संवाद आजही प्रत्येकाला तोंडपाठ आहेत. तर आज याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये एका चिमुकल्याने राजपाल यादवची नक्कल करून दाखवली आहे.

व्हायरल व्हिडीओत एक चिमुकला दुकानात ५०० रुपये सुट्टे करण्यासाठी आला आहे. चिमुकला दुकानात येताच ‘चौ-चौ के दे दो’ असे दुकानदाराला म्हणतो. तोतलं बोलणाऱ्या मुलाची मजा घेण्यासाठी दुकानदार त्यांच्यातील संभाषण आणखीन लांबवण्याचा निर्णय घेतो. संवादात लहान मुलाला गुंतवून पैसे मिळालेच नाही, असे सांगून दुकानदार मुलाची मस्करी करताना दिसतो. त्यानंतर मुलाने राजपाल यादव यांच्या शैलीत दिलेलं उत्तर व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

Abhishek Gaonkar and Sonalee Gurav
“माझ्या वडिलांचा विरोध…”, सोनाली अन् अभिषेक गावकरने सांगितला लव्ह स्टोरीचा रंजक किस्सा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”

हेही वाचा…‘तड़प-तड़प के इस दिल से…’ स्कूटरची रोजची कटकट पाहून ग्राहक वैतागला; थेट शोरूमला पोहचला अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

राजपाल यादव यांची हुबेहूब नक्कल :

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, व्हिडीओमध्ये एक चिमुकला दुकानदाराकडे ५०० रुपयांचे सुट्टे मागतो. ‘चौ-चौ के दे दो’ (१००-१०० असे सुट्टे द्या) असं तोतलं बोलून त्यांच्यातील संवाद सुरू होतो. संवादात लहान मुलाला गुंतवून तो पैसे ड्रॉवरमध्ये ठेवतो आणि मिळालेच नाही असं नाटक दुकानदार करतो. तेव्हा चिमुकला ‘पैसे तो दे दिए’ असं अगदी राजपाल यादव यांच्या शैलीत दिलेलं उत्तर देतो. त्याचे हावभाव, त्याची बोलण्याची व उभं राहण्याची स्टाईल तुम्हालाही अभिनेता राजपाल यादव यांची आठवण करून देईल एवढं नक्की.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @smtbusiness या यूट्यूब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘बेबी राजपाल यादव’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकऱ्यांनादेखील हा व्हिडीओ पाहून राजपाल यादव यांची आठवण झाली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘हा व्हिडीओ राजपाल यादवला बघायला द्या, मला खात्री आहे की त्यांना हा व्हिडीओ नक्की आवडेल.’ तर दुसरा युजर म्हणतोय की, ‘”खूप क्यूट. सेम टू सेम छोटू राजपाल यादव. कोणीतरी त्याला लवकरच चित्रपटात कास्ट करा” आदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader