video shows man and a lioness sitting on a hill : सिंहाच्या गर्जनेसमोर मोठे मोठे बलाढ्य प्राणी देखील नतमस्तक होतात. जर एखादा प्राणी त्याच्या तावडीत सापडला तर तो त्याला संपवूनच थांबतो. मग समोर माणूस जरी असला तरी तो त्यांची शिकार करायला मागे पुढे बघत नाही. यावरून तुम्ही सिंहाच्या शक्तीचा अंदाज नकीच लावू शकता. जंगल सफारीदरम्यान असे अनेक व्हिडीओ समोर येतात, ज्यामुळे लोकांची अवस्था वाईट होते. तर जंगलात सिंह किंवा सिंहिणीला पाहून भल्याभल्यांची अवस्था बिकट होते. मात्र, आज सोशल मीडियावर काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं आहे. एक सिंहीण चक्क अज्ञात व्यक्तीला मिठी मारताना दिसली आहे.

व्हायरल व्हिडीओ परदेशातला आहे. अज्ञात व्यक्ती वन्य प्राणी म्हणजेच पांढरी सिंहीणीबरोबर टेकडीवर बसली आहे. व्हिडीओ दिसतंय त्याप्रमाणे तो तिला घाबरत नाही हे सिद्ध होत आहे. सुरवातीला ती प्रेमाने व्यक्तीसं मिठी मारते, त्याला गोंजारते, तर जिभेने त्याचे शरीर देखील चाटताना दिसते आहे. त्यानंतर काही वेळाने व्यक्ती जंगलात शांत झोपलेली दिसत आहे त्याच्याबाजूला ही सिंहीण शांत पडून आहे. सिंहीणीमध्ये आक्रमकतेची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. एकदा पाहाच हा हृदयस्पर्शी व्हिडीओ.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक

हेही वाचा…विश्वास ठेवायचा कोणावर? लिफ्ट देणाऱ्या दुचाकीस्वाराचं चोरलं पाकीट; संशय येताच बेदम मारलं अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

सिंहीण अन् ‘त्याची’ अनोखी मैत्री :

व्हायरल व्हिडीओत (VIDEO) तुम्ही पाहिलं असेल की, व्यक्तीला वन्य प्राण्यापासून सुरक्षित वाटते. तसेच सिंहिणीला सुद्धा विश्वास आहे की त्या व्यक्तीपासून आपल्याला कोणीही इजा करणार नाही. त्यामुळे त्याच्यावर हल्ला न करता त्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसून आली आहे. तसेच दोघेही टेकडीवर बसून हिरव्यागार, थंडगार वातावरणाचा आनंद लुटताना दिसत आहेत आणि येथेच व्हिडीओचा शेवट होतो. व्हायरल व्हिडीओ प्राणी व मनुष्य यांच्यातील प्रेमळ नातं दर्शवत आहे असे म्हणायला हरकत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (VIDEO) @servalwildlife या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओचे कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, “किती सुंदर प्राणी आहे”. दुसऱ्याने कमेंट केली की, “सिंहिणीचे या व्यक्तीवर असलेले प्रेम पाहून मन भारावून गेलं’ , तर तिसऱ्याने लिहिलं की, असे व्हिडीओ प्राणी व मनुष्य यांच्यातील प्रेमळ बंधाचे उत्तर उदाहरण दाखवतात. अशाप्रकारे हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Story img Loader