Video Shows Man Braiding His Wife Hair On A Hospital Floor : एखाद्याकडे गाडी, बंगला, देखणा चेहरा, चांगल्या पगाराची नोकरी आदी गोष्टी बघून त्याच्या किंवा तिच्या प्रेमात पडणे खूप सोपे असते. पण, जेव्हा या सगळ्या गोष्टी कमावताना आपण त्या व्यक्तीबरोबर असतो. त्याला कष्ट करताना पाहतो, त्याच्या गरिबीतल्या दिवसांत त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो, तेव्हा त्या प्रेमाचा खरा अर्थ जाणवतो. तर आज सोशल मीडियावर असेच एक उदाहरण दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये नवरा-बायकोच्या नात्यातील खास क्षण पाहायला मिळाला आहे.

महबूबनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या अभिनव संदुलला एका हॉस्पिटलमध्ये खूप खास क्षण पाहायला मिळाला. हॉस्पिटलच्या मजल्यावर एक जोडपे खाली लादीवर बसलेले दिसत आहे. नवरा आपल्या बायकोचे केस हलक्या हाताने विंचरून वेणी बांधताना दिसत होता. हा क्षण पाहून वैद्यकीय विद्यार्थी थोडा भावूक झाला आणि त्याने हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअरसुद्धा केला. जोडप्याचा सुंदर क्षण व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

आजकालची जोडपी हातात हात पकडून चालायलाही लाजतात; पण अपेक्षा मात्र खऱ्या प्रेमाची करतात. पण, खरे प्रेम म्हणजे एखाद्याच्या दुःखात त्याच्याबरोबर राहणे, त्याची साथ देणे यामध्येच असते हे आज व्हिडीओत (Video) दिसले. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, वेणी घालण्याआधी आपल्या नवऱ्याने बायकोच्या केसांचा गुंता सोडवला. तेव्हा बायको शांतपणे बसली होती आणि थोडी अस्वस्थसुद्धा वाटत होती. पण, नवऱ्याने तिची अस्वस्थता दूर करून, प्रेमाने तिची वेणी बांधली. हा क्षण पाहून वैद्यकीय विद्यार्थी भारावून गेला आणि त्याने हा व्हिडीओ नकळत शूट करून सोशल मीडियावर शेअर केला.

परिस्थिती कठीण असताना एकत्र राहणे…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @uneek.wrld या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘खरे प्रेम हे शब्दांत नसते आणि हॉस्पिटलच्या वॉर्डात दिसते, वेदना सहन करताना हात धरून राहणे, परिस्थिती कठीण असताना एकत्र राहणे’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून ‘आजारी, दुःखात किंवा आयुष्यात काहीच राहिले नाही, असे वाटणाऱ्या व्यक्तीबरोबर असणे म्हणजे खरे प्रेम आहे’, ‘आज मी एक पेशंट पाहिला तो त्याच्या आरोग्याच्या समस्यांमुळे खूप रडत होता आणि त्याची बहीण अक्षरशः त्याची खूप छान काळजी घेत होती, हेच तर प्रेम असते ना’ आदी विविध कमेंट्स नेटकरी करीत आहेत.

Story img Loader