Video Shows Man Dresses Puppy In T Shirt And Pants : अनेकदा आईच्या प्रेमाबद्दल उघडपणे चर्चा केली जाते. पण, बाबांचे प्रेम मात्र त्यांच्या मनातच दडून असते. बाबा शिस्त लावतो; पण आपल्याबरोबर धमालही तितकीच करतो. प्रेम मनात लपवतो; पण छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासाठी करून नकळत ते प्रेम व्यक्तसुद्धा करतो. मग ते प्रेम माणसासाठी असो किंवा प्राण्यासाठी… तर आज सोशल मीडियावर हेच दाखविणारा व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे. त्यामध्ये बाबा आपल्या पाळीव श्वानाच्या पिल्लाला छान कपडे घालून तयार करताना दिसले आहेत.
व्हायरल व्हिडीओनुसार (video) एका भटक्या पाळीव श्वानाची जबाबदारी या व्यक्तीने घेतलेली दिसते आहे आणि एखादे बाबा आपल्या मुलाला फिरायला घेऊन जातात अगदी त्याप्रमाणे ते आपल्या पाळीव श्वानाला तयार करताना दिसत आहेत. व्यक्तीच्या सायकलला अनेक जुने टायर लावल्याचे दिसत आहेत. त्याचप्रमाणे लहान मुले दुचाकीवर पुढे बसतात अगदी त्याचप्रमाणे त्यांनी पाळीव श्वानाला बसवल्याचे दिसते आहे. फक्त एवढेच नाही, तर ते त्या श्वानाला बाहेर घेऊन जाण्यासाठी कसे तयार करतात आहे हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, व्यक्तीने आपल्या मुलाप्रमाणे पाळीव श्वानाच्या छोट्या पिल्लाला पुढे बसवले आहे. एवढेच नाही, तर त्याला छोटेसे टीशर्ट, कॅप आणि पँटदेखील घातल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे श्वानदेखील कोणतीही चुळबुळ न करता आपल्या मालकाला सहकार्य करताना दिसत आहे. त्यानंतर ती व्यक्ती श्वानाला दुचाकीवर बसवून निघून जाते; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
हा श्वान खरंच खूप क्युट आहे…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @tivvvvy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘वडिलांच्या प्रेमाला सीमा नसते’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हे खास दृश्य पाहून व्हिडीओचे भरभरून कौतुक करीत आहेत. या व्हिडीओवर “मालक जेव्हा पँट घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो कसा नम्रपणे उभा राहतो हे पाहून खूप मस्त वाटले”, “हा श्वान खरंच खूप क्युट आहे”, “एकच खंत आहे की, हा व्हिडीओ खूप छोटा आहे” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसत आहेत.