तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल तरी अंड्यातून कोंबडीचं पिल्लू जन्माला येते पण तुम्ही कधी हे पाहिलं आहे का? अर्थाथच नाही पण आता तुम्ही ते पाहू शकता. एका व्यक्तीच्या एका प्रयोगामुळे हे पाहणे शक्य झाले आहे. खुल्या अंड्यामध्ये कोंबडीचा भ्रूणपासून जिवंत पिल्लू होतानाचा एक अविश्वसनीय व्हिडिओ इंटरनेटवर सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्व जण थक्क होते आहे.
व्हायरल होत असलेला हा मुळात जुना आहे. मूळत: २०१६ मध्ये हा व्हिडीओ शेअर केला गेलेला आहे जो सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. हा मेडिकल व्हिडिओ हँडलद्वारे ट्विटरवर पुन्हा पोस्ट केले गेले आहे. या व्हिडीओमध्ये एका खुल्या अंड्यातून कोंबडी बाहेर येईपर्यंत संपूर्ण २१ दिवसांची प्रक्रिया जलद गतीने दाखविण्यात आली आहे. व्हिडिओला जवळपास३ दशलक्ष व्ह्यूज आणि सुमारे ३२हजार लोकांनी पसंती दर्शवली आहे. अनेकांना या व्हिडीओवर विश्वास ठेवण्यास कठीण जा होते आणि त्यांनी धक्का व्यक्त करणारे अनेक इमोजी शेअर केले आहेत.
व्हिडीओमध्ये दिसते की, सुरुवात एका व्यक्तीने अंडी फोडून, ते प्लास्टिकच्या पाऊचमध्ये टाकून आणि काही दिवसांनी ते उबवण्यापासून पिल्लू येईपर्यंतची प्रक्रिया दाखवली आहे.
हेही वाचा – Optical Illusion Challenge : फोटोमध्ये लपला आहे एक कुत्रा! १० सेंकदात शोधून दाखवेल तोच खरा बुद्धिमान!
सीएनबीसीच्या एका जुन्या लेखानुसार, हा व्यक्ती जपानी विद्यार्थी होता, जो काही विशिष्ट ठिकाणी अंड्यातील भ्रूणात काही इंजेक्शन देण्यासाठी सिरिंज वापरताना दिसत आहे.
अनेकांनी व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, परंतु मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटीमधील पोल्ट्री सायन्सचे प्राध्यापक ई डेव्हिड पीबल्स यांनी सीएनबीसीला सांगितले की, ”ही प्रक्रिया शक्य आहे.”
प्रोफेसर पीबल्स म्हणाले की, टटत्यांनी नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये असेच काहीतरी पाहिले.”
डेली डॉटमधील दुसर्या लेखात म्हटले आहे की, ”या प्रकारच्या प्रक्रियेचा संदर्भ किमान १९७१ च्या वैज्ञानिक साहित्यात आहे.;”
जर्नल ऑफ पोल्ट्री सायन्स २०१४ मध्ये एका लेखात, अंड्यातील भ्रूणांपासून कोंबडीची वाढ करण्यासाठी “शेल-लेस” पद्धतीमुळे “ट्रान्सजेनिक चिकन (transgenic chickens), भ्रूण हाताळणी (embryo manipulations), ऊतक अभियांत्रिकी (tissue engineering) आणि पुनर्जन्म औषधातील मूलभूत अभ्यासामध्ये आणखी संशोधन कसे होऊ शकते हे सांगितले आहे.
हेही वाचा – पुंगीच्या तालावर नव्हे, चक्क रॉक म्युझिकवर नाचतो हा साप; Viral Videoपाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!
पण प्रोफेसर पीबल्स सांगितले की, ”ही प्रक्रिया व्यावसायिक कोंबडी प्रजननात(commercial chicken breeding) किंवा अन्नासाठी कोंबडी पाळण्यासाठी वापरली जाणारी गोष्ट नाही. हे सोपे नाही. .त्या व्हिडीओमध्ये जी प्रक्रिया दाखवली हे कृत्रिम वातावरणात ते अर्ध-पारगम्य(semi-permeable ) संरक्षणात्मक आवरण प्रदान करत आहे जेणेकरुन पाणी निघून जाऊ शकते आणि वायूंची प्रक्रिया होऊ शकते,”