Video Shows Man Plays Shah Rukh Khans Iconic Mohabbatein : बॉलीवूडचा किंग खान, अभिनेता शाहरुख खान याचे जवळजवळ सगळेच चित्रपट चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. कुछ कुछ होता हैं, कभी खुशी कभी गम, डॉन, करण-अर्जुन, मोहब्बतें, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ते अगदी आयकॉनिक चित्रपट ‘मोहब्बतें’पर्यंत अभिनेत्याची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. फक्त चित्रपटातील भूमिका, डायलॉगच नव्हे, तर या चित्रपटातील गाणीसुद्धा आजही प्रत्येकाला अगदी तोंडपाठ आहेत. आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती मोहब्बतें या चित्रपटातील आयकॉनिक ट्युन (धून) वाजविताना दिसली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एक भारतीय तरुणी, जी सध्या लंडनममध्ये राहते आहे. लिव्हरपूल रस्त्यावरून चालत असताना, तिला रस्त्याच्या कडेला फुटपाथवर एक व्यक्ती दिसली. ही व्यक्ती व्हायोलिनवर वाद्यावर ‘मोहब्बतें’ची धून वाजवत होती आणि त्या वाद्याची धून लंडनच्या परिसरात चारही बाजूंनी ऐकू येऊ लागली. त्यामुळे ती तरुणी थांबली आणि ते वादन रेकॉर्ड करू लागली. व्हिडीओ पाहून शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेची लाट निर्माण झाली. शाहरुख खानच्या ‘मोहब्बतें’ चित्रपटातील आयकॉनिक धून वाजविणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…गुजरातमध्ये पूरग्रस्त भागात अन्न पोहोचवण्यासाठी तारेवरची कसरत; VIDEO तून पाहा डिलिव्हरी बॉयची मेहनत

व्हिडीओ नक्की बघा…

‘मोहब्बतें’ची आयकॉनिक ट्युन :

व्हायरल व्हिडीओत ( Video) तुम्ही पाहिलं असेल की, आदित्य चोप्रा दिग्दर्शित मोहब्बतें हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील प्रत्येक गाणं आजही प्रत्येक चाहत्याच्या मनात घर करून आहे. त्यातच पूर्ण चित्रपटात थक्क करणारा ट्विस्ट असो किंवा एखादा रोमँटिक सीन त्यादरम्यान ‘मोहब्बतें’ची आयकॉनिक ट्युनमधे वाजायची. ही धून ऐकायला इतकी मधुर होती की, ऐकणाऱ्याच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहायचे नाहीत. तर, आज हीच धून एका भारतीय तरुणीला लंडनच्या रस्त्यावर ऐकू आली आणि ती थक्क झाली. तिनं व्हायोलिनवर धून वाजविणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शूट करून घेतला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ( Video) @rudrakshapatil_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “एक फ्लॅशबॅक, तुम्ही तुमच्या कामासाठी बाहेर पडता आणि त्या मार्गावर तुम्हाला ही धून ऐकायला मिळते”, अशी या व्हिडीओला देण्यात आली आहे. कन्टेन्ट क्रिएटरच्या या व्हिडीओने शाहरुख खानच्या चाहत्यांना भुरळ घातली. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘मोहब्बतें’तील हे वाद्य केवळ SRK चाहत्यांसाठीच नाही, तर संगीताची आवड असलेल्या प्रत्येकासाठी खास आहे. तर दुसऱ्याने कमेंट केली आहे, “माझं या गाण्यावरचं प्रेम काही वेगळंच आहे.” आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.