Video Shows Man Rescuing Turtle Trapped In Plastic : प्रत्येक घरात कचऱ्याने भरलेली एक बॅग तयार असते. निवडलेल्या भाज्यांचे देठ, बिस्कीट पुड्याचा कागद, रात्रीच शिळं किंवा उरलेलं अन्न पिशवीत घालून कचराकुंडीत फेकले जाते. काही जण ओला व सुका वेगवेगळा टाकतात जेणेकरून त्याची विल्हेवाट लावली होईल. पण, काही जण नदी-नाल्यात, समुद्रात हा कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांसह फेकतात आणि ते खाण्यासाठी नदी, समुद्रातील प्राणी तिथे येतात. चुकून प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेकदा प्राण्यांचा मृत्यू होतो. प्लास्टिक गिळल्यामुळे त्यांचे पोट भरते आणि यामुळे भुकेची भावना कमी होते. आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मासे पकडण्याच्या प्लास्टिकच्या जाळ्यात एक कासव अडकलं आहे.
व्हायरल व्हिडीओ ट्युनिशियाचा आहे. ट्युनिशियाचा रहिवासी मेचेरगुई अला, मासेमारीचे अनेक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करतो. तर आज देखील त्याने नेहमीप्रमाणे एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने पाहिलं की, समुद्रात कासव पोहण्यासाठी धडपडत आहे. कारण – मासे पकडण्याच्या प्लास्टिकच्या जाळ्यात कासव अडकलेलं दिसत आहे. व्यक्तीनं कासवाला पाण्यातून बाहेर काढले. त्याने कासवाला बोटीवर बसवले आणि चाकूच्या साहाय्याने काळजीपूर्वक त्याच्या मानेपासून प्लास्टिक वेगळे केले. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, कासवाच्या पायाभोवती प्लास्टिकच्या पिशवीचा दोरा देखील अडकला होता ; जे व्यक्तीनं पाण्यात सोडण्यापूर्वी हळूवारपणे काढले. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी पहिला. तसेच त्यांनी हा व्हिडीओ रिपोस्ट करत , मासे पकडण्याच्या प्लास्टिकच्या जाळ्यात अडकलेल्या कासवाचे प्राण वाचवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच व्हिडीओखाली “प्लास्टिकने मृत्यू होतो. हे मौल्यवान कासव #stopplasticpollution वाचवल्याबद्दल @mecherguiala धन्यवाद.” ;अशी कॅप्शन दिली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांच्या @supriyasahuias या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी देखील कासवाला वाचवल्याबद्दल व्यक्तीचं कौतुक केले आहे. तर काही लोकांनी पर्यावरणावर होणाऱ्या प्लास्टिकच्या प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावावरही चर्चा केली. प्राण्यांच्या शरीरातून प्लास्टिक पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. प्लास्टिकमुळे दरवर्षी दहा लाख समुद्री पक्षी, एक लाख समुद्री सस्तन प्राणी, कासव, मासे मृत्युमुखी पडतात. त्यामुळे कचऱ्याची योग्य व्हिलेवाट लावणं ही आपल्यातील प्रत्येकाची जवाबदारी आहे.