Video Of People Cooking Food On Train Tracks : ट्रेनने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे खाद्यपान प्रशासनाद्वारे गाडीत वा रेल्वेस्थानकावर जेवण पुरवले जाते. पण, अनेकदा हे जेवण चांगल्या दर्जाचे नसल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात असते. तसेच काही छोटे व्यवसाय करणारे फेरीवालेसुद्धा या रेल्वेगाडीमध्ये फिरत असतात; जे अगदी पाण्याच्या बाटलीपासून ते वडापाव, चिक्की असे नाश्त्याचे विविध खाद्यपदार्थ विकताना दिसतात. पण, अनेकदा हे पदार्थ कुठे व कसे बनवले जात असतील, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात डोकावत असतोच. आज तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून बटाट्याची भाजी बनविण्यासाठी पूर्वतयारी कशी केली जाते हे दाखवण्यात आलं आहे.

व्हायरल व्हिडीओ (Video) कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. या व्हिडीओमध्ये रेल्वे रुळांच्या बाजूला दोन व्यक्ती मिळून भाजी बनविण्यासाठी पूर्वतयारी करताना दिसत आहेत. त्यांनी रेल्वे रुळांच्या बाजूला दोन टोप ठेवले आहेत. त्यातील एका टोपात बटाटे आहेत. ते बटाटे कुस्करण्यासाठी कोणताही चमचा किंवा हातामोजे न वापरता, चक्क पायांनी ते बटाटे कुस्करले जात आहेत. तुम्हीसुद्धा ट्रेनममध्ये मिळणारे पदार्थ खात असाल, तर हा व्हायरल व्हिडीओ एकदा नक्की बघा…

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
Pakistan International Airlines Flight
पाकिस्तानच्या विमानाने तुम्ही कधी प्रवास केलाय का? प्रवाशाने शेअर केलेला Video पाहून तुमचीही झोप उडणार!
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
video of women using an escalator for the first time suddenly fell on their face viral video
‘चिन टपाक डम डम’ गावाकडच्या महिला पहिल्यांदाच एस्केलेटरवर गेल्या अन्…VIDEO चा शेवट पाहून पोट धरुन हसाल
Dirty Ice Cream Making Video never buy and eat 5 rupees ice cream in shop
पाच रुपयांत मिळणारे कप आईस्क्रीम खाणाऱ्यांनो ‘हा’ Video पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा कराल विचार
anganwadi worker cross the flooded river video goes viral
Video : पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय केले?

हेही वाचा…VIDEO: अवघ्या आठ तासांत रचले ५४ थर; पत्त्यांच्या मदतीने उभारले सुंदर घर; पाहा अनोखा रेकॉर्ड

व्हिडीओ नक्की बघा…

खाद्यपदार्थ कुठे व कसे बनवले जातात?

व्हायरल व्हिडीओत ( Video) तुम्ही पाहिलं असेल की, रात्रीची वेळ आहे आणि व्यक्ती बटाटे कुस्करण्यासाठी हात किंवा चमचा नाही तर पायांची मदत घेताना दिसते आहे. बटाटे भरलेल्या टोपात व्यक्ती चालत बटाटे कुस्करते आहे. तसेच दुसऱ्या व्यक्तीने बघ्याची भूमिका घेतली आहे. हे दृश्य तेथे उपस्थित असणाऱ्या काही अज्ञात व्यक्तींनी पाहिलं आणि लपूनछपून हा व्हिडीओ शूट केला; जेणेकरून रेल्वे प्रशासनाचे व प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेही डोळे उघडतील.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gktrickindia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “ट्रेनने प्रवास करताना घरूनच अन्न घेऊन जा… नाही तर हा व्हिडीओ पाहा”, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही जण त्या व्यक्तीच्या या संतापजनक कृत्यावर व्यक्त होत आहेत; तर अनेक युजर्स ट्रेनच्या प्रवासात बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नका, असे इतरांना सांगताना दिसत आहेत. एकूणच हा व्हिडीओ प्रत्येक प्रवाशाला विचार करायला भाग पाडणारा आहे.