Video Shows Man Unique Birthday Celebration : वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला खास दिवस असतो. हा खास दिवस कुटुंबातील सदस्यांबरोबर आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीबरोबर घालवावा, अशी इच्छा मनात कुठेतरी घर करून असते. तर आज सोशल मीडियावर एक आगळावेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीनं स्वतःचा वाढदिवस मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य किंवा प्रेयसी-प्रियकरबरोबर न घालवता, सापांबरोबर साजरा केला आहे. पण, असं करण्यामागचं नेमकं कारण काय ते बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…
प्राणिसंग्रहालयाचे संस्थापक जय ब्रेवर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चक्क त्यांनी ‘सापांची पार्टी’ ठेवली आहे. एका खोलीत अनेक विविध प्रकारचे, वेगवेगळ्या आकारांचे, अनोख्या रंगांचे व नक्षी असलेले साप दिसत आहेत. तसेच या सापांमध्ये प्राणिसंग्रहालयाचे संस्थापक झोपी गेले आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. व्यक्तीने आपला वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
हेही वाचा…रस्त्यावर ‘येई हो विठ्ठले’ची धून अन् फ्लॅटमधील महिलेचा डान्स; लोखंडवालातील व्हायरल VIDEO एकदा बघाच
व्हिडीओ नक्की बघा…
‘ही एक स्नेक पार्टी आहे…’
व्हायरल व्हिडीओत ( Video) तुम्ही पाहिलं असेल की, प्राणिसंग्रहालयाच्या संस्थापकांनी जोखीम पत्करून अनेक सापांनी स्वतःला वेढून घेतलेलं दिसत आहे. ते हा व्हिडीओ शेअर करीत म्हणाले, ‘ही एक स्नेक पार्टी आहे. आज माझा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मला सर्वांना सांगायचे होते की, तुम्ही दिलेल्या प्रेमाचे मी कौतुक करतो. या माझ्या सर्प मित्रांबरोबर आणखी एक वर्षभर मी धमाल केली. तुमच्यापैकी ज्यांनी माझ्या प्रवासात मला साथ दिली, त्यांना धन्यवाद! कारण त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आलो आहे, असे त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ( Video) @ayprehistoricpets या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्यक्तीचं हे अनोखं धाडस पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. काही युजर्सनी प्राणिसंग्रहालयाच्या संस्थापकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर, अनेकांनी, “मला विश्वास बसत नाही की, तेथे किती अजगर आहेत! ही आतापर्यंतची सर्वांत छान पार्टी दिसते.” आदी अनेक कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. अनेक वर्ष प्राणिसंग्रहालयात राहिल्यामुळे व्यक्तीची त्याच्या सर्प मित्रांबरोबर गट्टी जमली आहे. म्हणूनच की काय प्राणिसंग्रहालयाच्या संस्थपाकांनी वाढदिवस अशा खास पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.