Video Shows Boy’s Group Celebrate Dog Birthday : वाढदिवस म्हटले की, डोळ्यांसमोर येते ते फक्त आणि फक्त सेलिब्रेशन. मग ते सेलिब्रेशन लहान असो किंवा मोठे, त्यावेळी कोणी साधे फूल दिले तरीही एखाद्याचा दिवस अगदी खास होऊन जातो. तुम्ही आतापर्यंत घर, हॉल, महागडे हॉटेल आदी अनेक ठिकाणी वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करण्यात आलेला पाहिला असेल. आजकाल अनेक जण प्राण्यांचासुद्धा वाढदिवस साजरा करतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे. त्यामध्ये अगदी ग्रँड पार्टीसुद्धा फिकी पडेल असा श्वानाचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला रस्त्याकडेला लावलेले एक भलेमोठे होर्डिंग दिसते आहे. या होर्डिंगवर एका श्वानाचा फोटो दिसतो आहे. या श्वानाचे नाव लूडो (Ludo) असते आणि त्याचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असतो. श्वान लूडोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक ओपन जीप झेंडूच्या फुलांनी सजवल्याचे दिसत आहे. त्यामध्ये सात ते आठ मित्रांचा एक ग्रुप आणि त्यांनी पाळीव श्वानाला हार घालून तयार केल्याचे दिसते आहे. श्वान लूडोचे खास सेलिब्रेशन व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
आपल्यातील अनेकांना पाळीव प्राण्यांबद्दल दया, प्रेम, आपुलकी असते. ते घराबाहेर जरी आले तरीही आपण त्यांना मायाने कुरवाळतो, खाऊ घालतो. तर आज व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, श्वान लूडोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मोठे होर्डिंग रस्त्यावर लावून, त्याची जीपमधून मिरवणूक काढण्यात आली आहे. त्यानंतर केक कापून, त्याचा वाढदिवस अगदी हटके पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. ते पाहून तुम्ही या तरुण मंडळींचे नक्कीच कौतुक कराल.
हे सेलिब्रेशन खूप सुंदर आहे…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @anshu_09_chouhan आणि @ludo_bhaiye या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘लूडो भावाचा वाढदिवस साजरा करण्यात आला,’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. अनेक जण व्हिडीओ पाहून श्वानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच अनेक जण या तरुण मंडळींच्या ग्रुपचे कौतुक करत आहेत. तसेच श्वानाच्या काळजीपोटी एका युजरने, “हे सेलिब्रेशन खूप सुंदर आहे; पण केक आणि गोड पदार्थ श्वानासाठी चांगले नाहीत”, अशी कमेंट केली आहे.