Viral Video Of Pet Dog And Owner : सकाळी काही जणांना भरपेट नाश्ता करायला आवडते; तर काही जण अगदी उपाशीपोटीच घराबाहेर पडतात. अशातच काही जण असे असतात, जे फक्त चहा आणि बिस्कीट खाणे पसंत करतात. त्यांच्यासाठी चहा आणि बिस्कीट म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. पण, फक्त माणसांनाच चहामध्ये बिस्कीट बुडवून खायला आवडते का? तर नाही… कारण- आज सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ (Video) पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. कारण- एक श्वान आपल्या मालकिणीकडे त्याला चहामध्ये बिस्कीट बुडवून खायला देण्याचा हट्ट करतो आहे.

व्हायरल व्हिडीओनुसार (Video) मालकीण त्याच्या श्वानाबरोबर ट्रेनमधून प्रवास करते आहे. महिलेच्या एका हातात बिस्कीट आणि दुसऱ्या हातात चहाचा कप दिसतो आहे. तेव्हा ती श्वानाला विचारते, ‘तुला बिस्कीट असंच हवंय की बुडवून देऊ?’ कॅमेऱ्याच्या मागून ‘त्याला चहामध्ये बुडवूनच दे’ असे अनोळखी व्यक्ती म्हणते. त्यानंतर हे ऐकून श्वानसुद्धा होकार देताना दिसतो. मग श्वानाने होकार दिल्यावर मालकीण चहामध्ये बिस्कीट बुडवण्याचे नाटक (अभिनय) करते आणि श्वानाला बिस्कीट भरवायला जाते. श्वान ते बिस्कीट खातो का हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

अनेकदा आई लहान बाळांना छोट्या ग्लासमधून औषध देताना ते ज्यूस आहे, असे सांगून देते; जेणेकरून लहान मुले न रडता ज्यूस समजून औषधाचे सेवन करतील. तर व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, आपल्या पाळीव मालकाचा मुलाप्रमाणे सांभाळ करणारी मालकीणसुद्धा असाच काहीतरी जुगाड करते आणि चहामध्ये बिस्कीट बुडवण्याचे नाटक करते; पण श्वानाला सुरुवातीला ते खोटे वाटते. मग मालकीण बिस्कीट बुडवताना ‘शुक शुक’ असा आवाज करते आणि श्वानाला भरवते. मग आपले बिस्कीट चहामध्ये बुडवूनच दिले आहे, असा विश्वास श्वानाला वाटतो आणि तो मालकिणीने भरवलेले बिस्कीट गुपचूप खातो. अशा रीतीने व्हिडीओचा शेवट गोड होतो.

आई तुला फसवते आहे…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @p3wonderlust आणि @golden_pabloescobark या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘त्याने चहात न बुडवल्यामुळे बिस्कीट खाण्यास नकार दिला,’ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. चहात बिस्कीट बुडवण्याचा अभिनय चांगला होता, तुझी आई तुला फसवते आहे, लहानपणी माझी आईसुद्धा असेच करायची आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.

Story img Loader