Video Shows Little Girl First Flight Experience : फर्स्ट आर ऑल्वेज स्पेशल (first are always special) असे आपण अनेकदा म्हणून जातो. पहिले प्रेम, पहिला पाऊस, शाळा कॉलेजचा पहिला दिवस, पहिली गाडी, पहिले घर आणि सगळ्यात खास म्हणजे पहिला विमान प्रवास. या सर्वच गोष्टी पहिल्यांदा केल्यावर त्याचा अनुभव, त्याचे सुख काहीतरी वेगळेच असते, जे शब्दात सांगण्यासारखे नसते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये आईने आपल्या चिमुकलीचा पहिला विमान प्रवास दाखवला आहे.
व्हायरल व्हिडीओ (Video) परदेशातला आहे. लहान मुलांसोबत विमानाने प्रवास करणे अवघड असू शकते. त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीपासून ते झोपण्याच्या वेळेपर्यंत सगळ्याच गोष्टींचे वेळापत्रक बनवणे सोपे नसते. पण, योग्य नियोजन आणि थोडासा संयम ठेवून मुलांसोबतचा प्रवास सहज, आनंददायी अनुभवातसुद्धा बदलू शकतो. टिकटॉक स्टार ब्रुना फावाने अलीकडेच एक इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची पाच वर्षांची मुलगी नतालीचा पहिला विमान प्रवास दाखवण्यात आला आहे, जो खूपच आनंददायी आहे. एकदा बघाच पाच वर्षाच्या मुलीचा विमानप्रवास…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हिडीओच्या (Video) सुरुवातीला एका फ्लाइट अटेंडंटने नतालीचे मनापासून स्वागत केले आणि तिला तिच्या सीटवर घेऊन गेली. विमानात फर्स्ट क्लासमध्ये नेहमीपेक्षा प्रवाशांच्या बसण्यासाठी खास सोय केलेली दिसते आहे. एखाद्या छोट्या कॅबिनप्रमाणे चिमुकलीची सीट आहे. येथे झोपायला छोटासा बेड, बिल्ट इन लाईट्सने सुसज्ज एक छोटा आरसा, स्नॅक्स आणि इतर वस्तूंसह तिच्या सीटच्या भोवताली सजावट करण्यात आली आहे. तसेच टीव्ही आणि कार्टून बघायला, तर अंघोळ किंवा फ्रेश होण्यासाठी खास बाथरूम आणि खाण्यासाठी काही पदार्थसुद्धा देण्यात आले आहेत. व्हिडीओतील प्रत्येक सोय पाहून तुमच्याही भुवया उंचावतील एवढे नक्की…
चिमुकलीचा पहिलावहिला विमान प्रवास
फर्स्ट क्लासच्या सुविधा पाहून चिमुकली खूप खूश होते. त्यानंतर प्रवास झाल्यानंतर स्ट्रॉलर (stroller) मध्ये झोपून चिमुकली विमानतळावरून बाहेर येताना दिसते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @brunaandnatalie या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘मी माझ्या पाच वर्षांच्या मुलीला तिचा पहिला आंतरराष्ट्रीय विमान प्रवास फर्स्ट क्लासमधून केला. तिला हा प्रवास इतका आवडला की, तिने प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला आणि तिने विमानातून उतरल्यावरच झोपायचे ठरवले’; अशी कॅप्शन आईने व्हिडीओला दिली आहे.