Video Shows Mother Play Aaj Ki Raat On Harmonium : ‘स्त्री – २’ या चित्रपटातील ‘आज की रात’ हे गाणे आपल्यातील अनेकांनी ऐकले असेल. या गाण्यातील अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या डान्समुळे हे गाणे प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. या गाण्यावर इन्फ्लुएन्सर, तरुण मंडळींनी बरेच रील्स बनवले. त्यातच आज एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा ‘आज की रात’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतो आहे. पण, या व्हिडीओत एक ट्विटस्ट आहे. तो ट्विस्ट काय आहे चला जाणून घेऊ…

व्हायरल व्हिडीओ (Video) नेमका कुठला आहे हे कळू शकलेलं नाही. मात्र, आई व तिचा मुलगा तुम्हाला व्हिडीओत दिसतील. रूममध्ये आई पेटीवर ‘आज की रात’ हे गाणे वाजवत असते. खास गोष्ट अशी की, आई पेटी वाजवत ‘थोडी फुरसत भी मेरी जान कभी बांहों को दीजिये’ हे गाण्याचे बोल गाण्यास सुरुवात करते आणि तिचा मुलगा मागे उभा राहून अप्रतिम डान्स करताना दिसतो आहे. तालासुरात आईने गायलेले गाणे आणि त्याच्यावर चिमुकल्याचा जबरदस्त डान्स व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा एकदा नक्की बघा…

Jitendra Awhad vs Dhananjay Munde
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
deadbodies founf in meerut
कुलूप असलेल्या घरात आढळले पाच मृतदेह, जोडप्याचा मृतदेह जमिनीवर, तर चिमुकल्यांचा बेडमध्ये; कुठे घडली भीषण घटना?
Image Of Harsh Goenka.
L&T Chairman : “रविवारचे नाव ‘Sun-Duty’ करा”, रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या एल अँड टी च्या अध्यक्षांना अब्जाधीशाचा टोला
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
sandeep baswana on relationship with ashlesha sawant
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?

हेही वाचा…जेव्हा स्वप्न सत्यात उतरते…! वाढदिवसानिमित्त तिने स्वतःला गिफ्ट केली ‘ही’ व्हिंटेज कार; Video शेअर करत म्हणाली…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, आई तिच्या मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग सुरू करते आणि पेटीवर ‘थोडी फुरसत भी मेरी जान कभी बांहों को दीजिये’ हे गाणे वाजवत गातानासुद्धा दिसते. आईच्या गाण्याला साथ देत चिमुकला या गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करतो. त्याचे हावभाव, डान्स करण्याची स्टाईल आणि गाण्याची हुक स्टेप पाहून आईदेखील तिचे हसणे थांबवू शकली नाही. पण, चिमुकल्याच्या डान्सने सगळ्यांनाच प्रेमात पाडले असे म्हणायला हरकत नाही…

दोघेही टॅलेंटेड आहेत…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ghantaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘छोटूने कमाल केली’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. अनेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिकिया व्यक्त करत आहेत. कोण म्हणतय की, ‘आई आणि मुलगा दोघेही टॅलेंटेड आहेत’, तर दुसरा म्हणतोय की, ‘तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाच वर्षांचे असताना काय केले हे विसरला आहात का. एकतर तुमच्याकडे दाखवता येईल अशी कोणतेही टॅलेंट नव्हते किंवा तुमच्याकडे टीव्ही नव्हता. पिढ्यानपिढ्या मुलांनी घरात ट्रेंडिंग गाण्यांवर नृत्य केले आहे, हे काही नवीन नाही; फरक एवढाच की तिने ते रेकॉर्ड करून पोस्ट केले’, आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader