video shows professor dances to Kala Chashma song : बॉलीवूडचा ‘बार बार देखो’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ व सिद्धार्थ मल्होत्राचं ‘काला चष्मा’ हे गाणं आजवर अनेकांच्या मनात घर करून आहे. काला चष्मा या गाण्यावर अनेक कलाकार, क्रिकेटपटू, सर्वसामान्य नागरिक रील व्हिडीओ बनवत असतात. तसेच बर्थ डे पार्टी किंवा एखादा खास कार्यक्रम असेल तेव्हा या गाण्यावर डान्स सादर होणार नाही असं कधीच होणार नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये एक शिक्षिका या गाण्यावर डान्स सादर करताना दिसली आहे…
या गाण्यावर डान्स सादर केलेले अनेक व्हिडीओ ( Video) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही या गाण्याच्या चर्चा पाहायला मिळत आहे. तर आज केरळच्या एर्नाकुलममधील सेंट तेरेसा कॉलेजमधील एका सहाय्यक प्राध्यापिकाने एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या कौशल्याची एक खास झलक दाखवली आहे. साडी नेसून शिक्षिकेने असा डान्स केला की, इतर शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांचाही जल्लोष पाहण्यासारखा आहे. शिक्षिकेचा डान्स व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
रॅपर बादशाहानेही व्हिडीओखाली केली कमेंट :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, कॉलेजमध्ये एक कार्यक्रम सुरू असतो. यादरम्यान स्टेजवर विध्यार्थी व काही शिक्षक उभे असतात. या सगळ्यांमध्ये एक शिक्षिका सगळ्यांचे लक्ष वेधून घेते, कारण ‘काला चष्मा’ हे गाणं लागतं आणि साडी नेसून, एकदम स्वॅगमध्ये एक शिक्षिका डान्स करू लागते. त्यांचे हावभाव, त्यांची डान्स करण्याची स्टाईल, त्यांची ऊर्जा, त्यांच्या स्टेप्सने उपस्थितांची मनं जिंकली व सगळ्यांनी टाळ्या वाजवत, तर काहींनी डान्स करत त्यांना आणखीन प्रोत्साहन दिले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ( Video) @thejjjjj_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला ‘आम्हाला काही छान शिक्षिका कॉलेजमध्ये भेटल्या आहेत’; अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे. हा जबरदस्त डान्स पाहून बॉलीवूड रॅपर बादशाहानेही व्हिडीओखाली ‘प्रेझेंट मॅम’ अशी कमेंटदेखील केली आहे. या कार्यक्रमात उपस्थित एका विद्यार्थिनीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे; ज्याला जवळपास १० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.