Video Shows Dog Help Small Kitten : वाढत्या शहरीकरणात माणसांची घरे झपाट्याने वाढत गेली. पण, याचा परिणाम प्राणी-पक्ष्यांचा निवाऱ्यावर होताना दिसतो आहे. मग निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या या प्राणी-पक्ष्यांना मानवी वस्तीत राहण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय उरलेला दिसत नाही. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, मांजर, श्वान आपल्या दारात झोपतात, तर कधी गाडीच्या छतावर, कबुतर अंडी घालण्यासाठी बिल्डिंगच्या गॅलरीचा आसरा घेतात. कारण- त्यांना मदत करणारे कोणीच नसते. पण, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे. त्यामध्ये भटक्या मांजरीला श्वानाच्या मदतीचा हात मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओत (Video) मांजरीचे पिल्लू रस्त्याच्या मधोमध बसले आहे. एका गाडीने या मांजरीच्या पिल्लाला धडक दिल्याने हे पिल्लू रस्ता ओलांडण्यासाठी घाबरताना दिसते आहे. हे एक श्वान पाहतो व त्याच्याजवळ जातो आणि त्याला रस्ता ओलांडण्यासाठी ढकलताना दिसतो. पण, मांजर काही केल्या जागेवरून हलण्यास तयार नसते. मग, श्वान काही सेकंदासाठी माघार घेतो; पण त्याला मांजरीच्या पिल्लाला एकटेसुद्धा सोडून जायचे नसते. मग श्वान नेमके काय करतो हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, मांजरीच्या पिल्लाला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्यासाठी श्वान एकदा-दोनदा प्रयत्न करतो; पण मांजर काहीच प्रतिसाद देताना दिसत नाही. त्यामुळे श्वान काही सेकंदासाठी प्रयत्न करायचे सोडून देतो. पण, नंतर मांजरीच्या पिल्लाला एकटे सोडून कसे जाणार म्हणून श्वान पुन्हा एकदा प्रयत्न करतो आणि तोंडात अगदी हळूच श्वानाच्या पिल्लाला उचलून रस्त्याच्या बाजूला घेऊन जातो. फक्त एवढेच नाही, तर रस्त्याच्या कडेला मांजरीच्या पिल्लाला सोडल्यावर ते व्यवस्थित आहे ना याचीसुद्धा खात्री करतो.

प्राणी माणुसकी दाखवत आहेत आणि…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rajadhiraj_dwarkadhish_vn या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्राण्यांमधील माणुसकी पाहून अनेक जण विविध भावना व्यक्त करताना दिसत आहेत. “प्राणी माणुसकी दाखवत आहेत आणि माणसं व्हिडीओ बनवत आहेत”, “मी दोघांनाही दत्तक घेण्यासाठी तयार आहे”, “माणुसकी ह्यांच्यात आहे”, “त्यांना माहीत आहे की, हे लोक आपल्यासाठी कधीच हे करणार नाहीत म्हणून ते स्वतःसाठी करत आहेत” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video shows small kitten sit middle of the road dog helps her carrying in to the roadside asp