Viral Video Of Mother & Son : स्वतःचे सुख-दुःख विसरून संसारात रमणारी, प्रत्येक संकटांमध्ये ढाल बनून उभी राहणारी कुटुंबातील एकमेव सदस्य म्हणजे आई असते. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून त्यांना कधी प्रेमाने तर कधी छडीचा मार देऊन समजावत असते. पण, याउलट आईने हाताने मारलेला फटका खूप जास्त जिव्हारी लागणारा असतो, असं तुमच्यातील अनेकांनी नक्कीच अनुभवलं असेल… तर आज सोशल मीडियावर याचं मजेशीर प्रात्यक्षिक पाहायला मिळालं आहे. आईने दुचाकीवर बसलेल्या चिमुकल्याला सगळ्यांसमोर मार दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (viral Video) कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, ट्रॅफिकमुळे आई व चिमुकला रस्त्याकडेला थांबले आहेत. दुचाकीवर मागच्या बाजूस सामान ठेवण्यासाठी एक स्टोरेज बॉक्स ठेवला आहे. सिग्नलवर दुचाकी थांबली आहे, त्यामुळे आईचा चिमुकला खोड्या करण्यास सुरुवात करतो. हळूहळू दुचाकीवर बसवून घेतलेल्या स्टोरेज बॉक्सवर बसून गिरक्या घेण्यास सुरुवात करतो. त्यानंतर चिमुकल्याच्या या विचित्र मस्तीकडे आईचे लक्ष जाते. चिमुकल्याला मस्ती करताना पाहून आई नेमकं काय करते, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…Video : मांजरीचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या मांजरीची झुंज; चक्क चार श्वानांना लावलं पळवून!

व्हिडीओ नक्की बघा…

‘आईच्या हाताचा मार हा जागतिक उपाय’

लग्नसमारंभ किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर लहान मुलं नेहमी मस्ती करतात आणि मस्ती करण्यावरून आईच्या हातचा मारसुद्धा खातात, अशी एक आठवण तुमच्या मनात कुठेतरी दडलेली असेल. तर आज त्याचे लाइव्ह फुटेज (Viral Video) पाहायला मिळाले आहे. आईला चिमुकला स्टोरेज बॉक्सवर बसून गोल-गोल फिरताना दिसला. यादरम्यान चिमुकला चुकून तोल जाऊन खालीसुद्धा पडला असता, त्यामुळे रागात का होईना आई त्याच्याकडे बघते आणि हाताने एक जोरात फटका मारते आणि चिमुकला पुन्हा आपल्या जागेवर शांत बसतो.

ट्रॅफिकमध्ये उपस्थित एका अज्ञात व्यक्तीनं हा व्हिडीओ शूट करून घेतला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Viral Video) @socialkatta91 या इन्स्टाग्रामअकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला ‘आईच्या हाताचा मार हा जागतिक उपाय आहे’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण आईचे संवाद कमेंट करून सांगत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘म्हणून मी तुम्हाला कुठं नेत नाय, अशी आईची युनिव्हर्सल लाईन असते’, तर अनेक जण हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video shows son and mother funny bond between traffic signal on road she slap him in public watch funny moment asp