Video Shows Apple MacBook themed wedding invitation : लग्न म्हटले की घरात धावपळ सुरू असते. यादरम्यान खरेदी, विविध कार्यक्रमांचे आयोजन, नातेवाईक, पाहुणे, मित्र-मैत्रिणींना आमंत्रण द्यायचे असते. सध्या लग्नपत्रिका सहसा व्हॉट्सअ‍ॅपवरच पाठवल्या जातात. पण, काही जण आजही जुन्या परंपरा फॉलो करतात आणि घरोघरी जाऊन लग्नपत्रिका वाटताना दिसतात. पूर्वी अगदी एक-दोन पानांची साधी लग्नपत्रिका असायची. आता हळूहळू या लग्नपत्रिका थोड्या मॉडर्न होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही अनेक डिझाईन्सच्या विविध लग्नपत्रिका पाहिल्या असतील. पण, आज सोशल मीडियावर एक अनोखी लग्नपत्रिका व्हायरल होत आहे, जी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

इन्स्टाग्राम वापरकर्ता मनोज कुमार (@manoj_rationalist), थिरुकोविलूर, तामिळनाडू येथील पोलिस उपअधीक्षक, यांनी धर्मपुरी येथे १६ सप्टेंबर रोजी झालेल्या त्यांच्या लग्न समारंभाची लग्नपत्रिका दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. लग्नपत्रिका ॲपल मॅकबुक प्रो (Apple MacBook Pro) सारखी डिझाइन केली आहे; जी तुम्हाला एखाद्या खऱ्याखुऱ्या मॅकबुकसारखी दिसू शकते. तसेच या मॅकबुकसारख्या दिसणाऱ्या लग्नपत्रिकेत अगदी छोटी-छोटी गोष्ट प्रिंट करण्यात आली आहे. ही अनोखी लग्नपत्रिका व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…‘नातं इथपर्यंत हवं…’ गाण्यावर लिप-सिंक करत आजी-आजोबांनी प्रेम केलं व्यक्त; VIDEO तील अभिनय पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

व्हिडीओ नक्की बघा…

लग्नपत्रिकेत कीबोर्डची बटणं, तर लॅपटॉपच्या स्क्रीनवर गूगल सर्च बार :

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, प्रिंटरमधून मॅकबुकसारखी दिसणारी लग्नपत्रिका छापून बाहेर येते. ही लग्नपत्रिका ॲपल मॅकबुक प्रोप्रमाणे डिझाईन केली आहे. तसेच खास गोष्ट म्हणजे, ॲपल मॅकबुक लग्नपत्रिकेत कीबोर्डची बटणं, तर लॅपटॉपच्या स्क्रीनवर गूगल सर्च बार आहे. या सर्च बारमध्ये ‘मनोज व शालिनी’च्या लग्नाचा सोहळा असं लिहून, डावीकडे रिसेप्शन व लोकेशन, तर उजवीकडे लग्नाची वेळ, तारीख अगदी गूगलवर दिसतं तसं प्रिंट करून घेण्यात आलं आहे. त्यानंतर तुम्ही ही लग्नपत्रिका बंद केल्यावर तुम्हाला ॲपलचा लोगोसुद्धा दिसेल. त्यानंतर या लॅपटॉप लग्नपत्रिकेला रिबीन लावून पाहुण्यांमध्ये वाटण्यासाठी तयार केलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @manoj_rationalist या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत आणि संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. काही जण या कल्पनेवर हसत आहेत, तर काही जण कल्पनेचं व बनवणाऱ्या व्यक्तीचेदेखील कौतुक करत आहेत. त्याचप्रमाणे काही युजर्स ही लग्नपत्रिका बनवायला किती पैसे लागले हे सुद्धा आवर्जून विचारत आहेत. ही डिझाईन अनोखी तर आहेच, पण नवरा-नवरीचे तंत्रज्ञानावरील प्रेमसुद्धा दर्शवते आहे.