Viral Video Of Brother And Sister : भाऊ-बहिणीचे नाते आंबट-गोड असते म्हणायला हरकत नाही. भाऊ-बहीण एकमेकांशी भांडतात, एकमेकांना त्रास देतात. पण, तितकेच एकमेकांवर खूप प्रेम सुद्धा करतात. एकमेकांशी अनेकदा भांडणारी भावंडे आई-वडिलांसमोर मात्र एकमेकांच्या चुका अगदी सहज लपवतात. जेव्हा बाहेरची मंडळी त्यांच्या भावा किंवा बहिणीला एखादा वाईट शब्द जरी बोलले तर अगदी समर्थनासाठी एकेमकांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहतात. तर आज सोशल मीडियावर याच नात्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे.
व्हिडीओनुसार (Video) दोघे भाऊ-बहीण रस्त्याने चालत असतात. पण, रस्ता पाण्याने तुडुंब भरलेला दिसतो आहे. यादरम्यान आपल्याला बहिणीला पाण्यातून न नेता अगदी कडेकडेने सुरक्षित घेऊन जायचे असते. जेणेकरून ती पाण्यात पडणार नाही आणि तिला कोणतीही इजा सुद्धा होणार नाही. तर असे करण्यासाठी भाऊ तिला रस्त्याकडेला असणाऱ्या छोट्या-छोट्या दगडांवरून घेऊन जातो. पण, स्वतः मात्र पाण्यातून जाताना दिसतो. भावा-बहिणींचे प्रेम व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पहिले असेल की, चिमुकल्या बहिणीच्या पाठीवर बॅग असते, म्हणजेच ती क्लास किंवा शाळेतून घरी येत असते. तेव्हा भाऊ आपल्या चिमुकल्या बहिणीला घरी घेऊन जाण्यासाठी आला होता. तेव्हा रस्त्यावर भरपूर पाणी असल्यामुळे भाऊ बहिणीला रस्त्याच्याकडेने छोट्या छोट्या दगडांवर एकेक पाऊल टाकण्यास सांगतो. त्यानंतर तो तिला पाठीवर बसवतो आणि या पाण्यातून स्वतः चालत तिला घेऊन जातो, जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच आनंद येईल.
कोणाची नजर नको लागुदेत…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @temsutilaaier या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून ‘आज पहिलेला मी सगळ्यात सुंदर व्हिडीओ’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून त्यांच्या भावाला कमेंटमध्ये टॅग करताना दिसत आहेत. ‘कोणाची नजर नको लागुदेत, तर आपल्या भावाला टॅग करून तू तर मला पाण्यात ढकलून दिले असतेस, बघ तू पण माझ्यासाठी असे कर ना’ ; आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत.