Viral Video Of Aai : प्रत्येकाच्या आयुष्यात संकट दररोज येतच असतात. पण, त्यातूनही स्वतःचा काहीतरी जुगाड करून आई त्याच्यातून नक्कीच मार्ग काढते. कधी एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळत तर कधी घर आणि ऑफिस यांच्यात मेळ साधत असते. कोणाला ओरडून सांगायचे आणि कोणाला समजावून याचे गणित तिला अगदी बरोबर माहिती असते. तसेच ही आई तिची मुले असूदेत किंवा इतर पाळीव प्राणी प्रत्येकाला अगदी सामान वागवते. तर आज हेच दृश्य दाखवणारा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
व्हायरल व्हिडीओ डॉग ट्रेनरचा आहे. घरात तिचा श्वान वस्तूंची फेकाफेक करत असतो. त्यादरम्यान भिंतीला लागून असलेल्या पाळीव श्वानाच्या गादीखाली त्यातील एक वस्तू अडकलेली दिसते आहे. पण, ती वस्तू काढताना श्वान घाईगडबडीत आपल्या पायांच्या नखांचासुद्धा वापर करू लागतो. म्हणून आई ‘भिंत खणलीस ना तर मी तुला टांगून ठेवीन’ असे म्हणते. ‘नीट काढून ठेव जा’ असे म्हणते. हे ऐकताच श्वानाचे एक्स्प्रेशन बघण्यासारखे असतात आणि तो आईने सांगितल्याप्रमाणे नखांचा वापर न करता वस्तू काढण्याचा खूप प्रयत्न करतो आणि थांबतो. एकदा पाहाच हा मजेशीर व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, अनेकदा प्रयत्न करूनही श्वान गादीखाली अडकलेली वस्तू काढू शकत नाही. मग आईला दया येते आणि ती श्वानाला मार्गदर्शन करण्यास सुरुवात करते. ‘नाजूकपणे काढ जरा, गादी वर कर’ असे म्हणते. आईने सांगितल्याप्रमाणे श्वानसुद्धा तसेच करतो आणि अखेर ती वस्तू काढण्यात तो यशस्वी होतो. हे पाहताच आई ‘शाब्बास’ असे म्हणून त्याची प्रशंसा करते आणि श्वान ती वस्तू तोंडात पकडून धावत जातो आणि असा व्हिडीओचा गोड शेवट होतो.
बाळ शिस्तप्रिय झालंय…
व्हायरल होणारा हा व्हिडीओ @happytailspune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आमच्यातील संवाद…’ अशी कॅप्शन तिने व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी ‘जबरदस्त शिकवलं तुम्ही.. सगळं कळतंय, बोललेलंसुद्धा ऐकतोय तुमचं, हे असं फक्त आईच करून घेऊ शकते, टांगून ठेवेन जरा जास्तं होतं, पण बाळ म्हणून शिस्तप्रिय झालंय, ओरडल्यानंतर त्याचे एक्स्प्रेशन मस्त आहेत, आज्ञाधारी बालक’; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेले दिसत आहेत.