Video Shows Face Off Between Tiger & Cobra : वाघ हा जंगलातील अत्यंत भयानक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो, तर साप किंवा नाग पाहताच आपण दिसेल त्या दिशेने पळू लागतो. पण, जर या दोन्ही प्राण्यांचा कधी आमनासामना झाला तर नक्की काय होईल, असा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर आज सोशल मीडियावर असंच एक दृश्य पाहायला मिळालं आहे. जंगल सफारीदरम्यान पर्यटकांच्या एका ग्रुपने अलीकडेच या दोन प्राण्यांमधील दुर्मीळ सामना पाहिला आहे. तर नक्की काय घडलं ते आपण लेखातून सविस्तर जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडीओ महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगलाचा आहे. जंगलात लहान ओढ्याच्या मध्यभागी वाघ उभा आहे. वाघ कदाचित ओढा ओलांडून पुढे जाण्याच्या तयारीत दिसत आहे. पण, त्याच क्षणी एक नाग ओढ्यात येताना दिसला. वाघाला पाहून नाग त्या दिशेने वळला. तर नाग दिसताच वाघानेही हालचाल थांबवली आणि तो काही क्षणासाठी स्तब्ध झाला आणि दोन पावले मागे जाताना दिसला. पुढे नक्की काय घडलं, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
हेही वाचा…‘पैसे तो दे दिए…’ राजपाल यादव यांची हुबेहूब नक्कल करणारा चिमुकला; Video तून पाहा दुकानदार व त्याचा संवाद
व्हिडीओ नक्की बघा…
जंगलात कोब्राला पाहून वाघाने घेतली माघार :
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, वाघाकडे वळून पाहिल्यावर नागाला धोक्याची जाणीव झाली असावी. पण, वाघाने या क्षणाला कोणताही हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा घटनास्थळ सोडण्याचा प्रयत्न केला नाही. त्याऐवजी विषारी नागापासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी त्याने काही पावले मागे घेतली. वाघ आणि नाग यांच्यातील सामना पर्यटकांना खूपच आकर्षक वाटला, म्हणून की काय तेथील पर्यटकांनी हा क्षण मोबाइलमध्ये कॅप्चर केला; जो अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) भारतीय वन सेवा आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांच्या @rameshpandeyifs या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “वाघ विरुद्ध कोब्रा” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तर सोशल मीडियावरसुद्धा या व्हिडीओने अनेक निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे; ज्यांना वाघ आणि नाग यांच्यातील सामना खूपच आकर्षक वाटला. व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “प्राणी धोका कसा ओळखतात हे मला नेहमीच आश्चर्य वाटते”, आदी अनेक कमेंट करताना दिसत आहेत.