Video Shows Mom Dress Up The Dog With Hat & Sweater : सर्वत्र कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक जण थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर, ब्लॅंकेट, जॅकेट, शाल, तर कोणी उबदार वाटण्यासाठी शेकोटीदेखील पेटवतात. पण, थंडीत आपल्यासारखेच प्राण्यांचेही संरक्षण व्हावे यासाठी असेच काहीसे प्रयत्न आपणही करायला हवेत ना? तर यासाठी एका महिलेने जबरदस्त जुगाड केला आहे. एका महिलेने तिच्या पाळीव प्राण्याचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी खास स्वेटर, कानटोपी विणून व पॅन्ट शिवून घेतली आहे.
प्रत्येकाला घरात श्वान किंवा मांजर पाळण्याची प्रचंड आवड असते. पण, घरात त्याला वेळेत खायला देणार कोण, त्याची सेवा, स्वच्छता करणार कोण करणार, असे प्रश्न विचारून आई-बाबा नेहमीच या निर्णयाला विरोध करत असतात. पण, त्यांच्याविरोधात जाऊन जेव्हा आपण श्वान किंवा मांजरीला घरी घेऊन येतो. तेव्हा मात्र काही दिवसांतच हे पाळीव प्राणी पालकांचे लाडके होऊन जातात आणि मग हे पालक त्या प्राण्यांना मुलांपेक्षा जास्त जपतात. पाळीव श्वान आणि पालक यांच्यातील नातं व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा.
हेही वाचा…आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) घराचे टेरेस दिसते आहे. थंडीपासून संरक्षणासाठी आईने पाळीव श्वानासाठी खास स्वेटर विणून घेतलेले दिसते आहे. लहान मुलांना थंडी वाजू लागली की, आई कानटोपी, स्वेटर घालते. तसेच अगदी स्वेटर घालून आई श्वानाला घराच्या टेरेसवर घेऊन जाते. टेरेसच्या संरक्षक भिंतीवर श्वान दोन पाय टेकवून उभा असतो. तेव्हा तेथे उपस्थित असलेली एक अनोळखी व्यक्ती श्वानाचा व्हिडीओ शूट करते. तेव्हा तुम्हाला दिसेल की, श्वानाला कानटोपी, गुलाबी रंगाचे स्वेटर व खाली हाफ पॅन्टसुद्धा घातलेली आहे, जे बघायला खूपच मजेशीर वाटते आहे.
नाना-नानी पार्कमधली आजी
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @trendruiners या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘भारतातील प्रत्येक पालक ज्यांचा सुरुवातीला श्वानाला घरात पाळण्यास विरोध असतो; पण आता तेच पालक त्या श्वानाला लाडक्या मुलाप्रमाणे वागवतात’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा खूश झाले आहेत आणि ‘नाना-नानी पार्कमधली आजी वाटते आहेस, चाळीतली काकू बनवून टाकलंय तिला, हे फक्त एक आईच करू शकते’ आदी वेगवेगळ्या मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत.