Video Shows Traffic Police Officer Gave Punishment To Bus Driver : गाडी चालविताना आजूबाजूच्या वाहनचालक, रस्ता ओलांडणारी एखादी व्यक्ती यांना सावध करण्यासाठी वाहनांमध्ये हॉर्न बसविलेले असतात. पण, काही जण या हॉर्नचा उपयोग इतर चालकांना आव्हान देणे, सगळ्यांचे लक्ष वेधून घेणे यांसाठी करतात आणि विनाकारण वा शांतता क्षेत्रात हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करतात. या पार्श्वभूमीवर आज सोशल मीडियावर हॉर्नशी संबंधित एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका बसचालकाला हॉर्न वाजवणे चांगलेच महागात पडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनाकारण हॉर्न वाजवल्यास वाहतूक पोलिस अधिकारी वाहनचालकास दंड भरण्यास सांगतात. पण, आज व्हायरल व्हिडीओत काहीतरी वेगळेच पाहायला मिळाले आहे. व्हायरल व्हिडीओ कर्नाटकचा आहे. एक वाहनचालकाने विनाकारण कर्कशपणे हॉर्न वाजवला. त्यामुळे वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने ती महाविद्यालयाची बस रस्त्यात थांबवून, बसचालकास खाली उतरण्यास सांगितले आणि पुढे नक्की त्याच्याकडून दंड वसूल केला की आणखीन काय ते व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने बसचालकाला योग्य ती शिक्षा दिली. ट्रॅफिक पोलिस मोठ्या आवाजात एअर हॉर्न वाजवून बेशिस्त वाहनचालकाला संबोधित करताना दिसत आहे. त्यानंतर बसमधून खाली उतरवतात आणि बससमोर गुडघे टेकून, कान लावून बसायला सांगतात. तो वाहतूक पोलिस अधिकारी त्या चालकाला बसमधून खाली उतरवतो आणि बससमोर गुडघे टेकून, बसायला सांगतो. त्यानंतर जोरात बसचा हॉर्न वाजवण्यास सुरुवात होते आणि तो त्रासदायी आवाज चालकाला ऐकवला जातो; जेणेकरून इतरांना त्याचा किती त्रास होत असेल याची जाणीव बसचालकाला होईल.

योग्य शिक्षा दिली

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @vijeshetty या एक्स (ट्विटर)अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने हॉर्न वाजवणाऱ्याला योग्य शिक्षा दिली’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा या व्हिडीओवर वेगवेगळी मते मांडताना दिसत आहेत. एका युजरने, “धडा शिकवण्याची ही पद्धत योग्य आहे. याची खूप जास्त गरज होती. या पोलीस अधिकाऱ्याप्रमाणे बाकीच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा अशीच शिक्षा दिली पाहिजे,” अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video shows traffic cop makes bus drivers listen to their vehicle shrilling horn as punishment asp