Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts : झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिंट, झेप्टो आदी अनेक फूड आणि वस्तू घरपोच वा कार्यालया पोहोचवणाऱ्या विविध कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय दिवस-रात्र मेहनत करत असतात. पावसाळा, उन्हाळा असो किंवा हिवाळा कोणत्याही परिस्थितीत ते आपल्यापर्यंत अनेक गोष्टी पोहोचवत असतात. अनेकदा त्यांच्या कामाकडे बघून कौतुक, तर दुसरीकडे ते करत असणाऱ्या मेहनतीकडे पाहून मन भरून येते. म्हणून अनेकदा आपण त्यांना ‘पाणी प्यायला हवे का’, असे आवर्जून विचारतो. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सोशल मीडियावर दोन ब्लॉगरनी या डिलिव्हरी बॉयला खास भेटवस्तू दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Video) हैदराबादचा आहे. सोशल मीडिया ब्लॉगर, विनीता आणि निकिता यांनी काही नवीन वर्षाची सुरुवात खास करून डिलिव्हरी बॉयसाठी काहीतरी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी स्विगी इन्स्टामार्ट व ब्लिंकिटवरून काही वस्तू ऑर्डर केल्या. पण, त्या डिलिव्हरी केलेल्या वस्तू स्वतःकडे ठेवण्याऐवजी त्यांनी त्याच भेटवस्तू डिलिव्हरी बॉयला देण्याचे ठरवले. सोशल मीडिया ब्लॉगर, विनीता आणि निकिता यांनी भेटवस्तू दिल्यावर डिलिव्हरी बॉय यांची प्रतिक्रिया कशी होती ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, जेव्हा डिलिव्हरी बॉय ब्लॉगरच्या हातात ऑर्डर देतो आणि निघत असतो तेव्हा ती त्याला थांबवते आणि डिलिव्हरी बॉयकडे पिशवी देत ‘ही भेटवस्तू तुमच्यासाठी आहे’, असे म्हणते. चेहऱ्यावर एक स्मित आणून ‘हे माझ्यासाठी आहे? खरंच? (मेरे लिए?) असे आश्चर्यचकित होऊन डिलिव्हरी बॉय विचारतो. अशा प्रकारे सोशल मीडिया ब्लॉगर, विनीता आणि निकिता अनेक डिलिव्हरी बॉयला भेटवस्तू देतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणतात.

डिलिव्हरी बॉयच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा आहे

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @hyd_and_me या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “आम्ही स्विगी आणि ब्लिंकिटकडून भेटवस्तू मागवल्या आणि त्याच डिलिव्हरी बॉयला भेटवस्तू म्हणून दिल्या”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नवीन वर्षाची खूप आनंदी सुरुवात केली यात काही शंका नाही, डिलिव्हरी बॉयच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता आदी अनेक कमेंट्स तर “एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे,” अशी स्विगी इन्स्टामार्टच्या अधिकृत हॅण्डलवरून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video shows vloggers surprise blinkit swiggy delivery riders with gifts will win your heart asp