Viral Video Shows Mother And Son Love : मुलांवर सगळ्यात जास्त प्रेम कुणाचे असेल तर ते आईचे असते. ती आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. मुलांच्या जबाबदारीत, त्यांच्या संगोपनात तिचे उभे आयुष्य निघून जाते. पण, हीच आई एकेकाळी तिच्या आई-बाबांची लाडकी लेक असते. मुलगी, पत्नी, आई असा प्रवास करत तिच्याकडे एकेक हक्क येत जातात आणि हळूहळू आई-बाबाच्या लेकीवर जबाबदारीचे ओझे येते. तर आज या गोष्टीचे उत्तम उदाहरण दाखवणारा एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे, यामध्ये आई व तिचा मुलगा पंगतीत जेवताना दिसत आहेत.

जेव्हा लेक आई-बाबांकडे असते तेव्हा उशिरा उठणे, घरी एकही काम न करणे, सुट्टीच्या दिवशी झोपून राहणे आदी अनेक गोष्टी करताना दिसते. मात्र, लग्न झाल्यानंतर जेव्हा मूल होते, तेव्हा मात्र तिला स्वतःचे जबाबदार आईत रूपांतर करावे लागते. आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतसुद्धा (Video) तसंच पाहायला मिळालं. आई पंगतीत जेवायला बसली असते, मात्र तिचा लेक कधी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तर कधी तिच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे आणि आई प्रत्येक घास खाताना आपल्या मुलाला कुरवाळतानासुद्धा दिसते आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

आई ही आईच असते…

अनेकदा लहान मूल घरात असेल तर त्याला कुटुंबातील कोणत्याही कार्यक्रमाला घेऊन जाताना त्यांची प्रत्येक सोय करावी लागते. त्याला पहिले जेवायला द्यायचे, त्याची प्रत्येक सोय होण्यासाठी सामान बॅगेतून घेऊन जायचे; तर या सगळ्यात मात्र त्या आईची प्रचंड धापवळ होत असते. एकेकाळी आळशीपणा करणारी लेक आई झाल्यावर मात्र कोणताही कंटाळा न करता, कार्यक्रमाचा आनंद घेत तिची प्रत्येक जबाबदारी अगदी चोख पार पाडताना दिसते; हे या व्हिडीओत (Video) आज पुन्हा दिसून आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @neha_satpute2111 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘एका आळशी मुलीचे एका जबाबदार आईत कधी रूपांतर झाले कळलेच नाही’; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून ‘जबाबदारी माणसाला खूप काही शिकवून जाते….’, ‘तुझ्या प्रश्नामध्येच उत्तर आहे…’, ‘आई ही आईच असते’; आदी अनेक कमेंट करताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत.

Story img Loader