Video Shows Woman proposes to boyfriend on flight : चित्रपट, मालिका, वेब सिरीजमध्ये तुम्ही प्रियकर व प्रेयसीला एकमेकांना प्रपोज करताना नक्कीच पाहिलं असेल. हा खास दिवस लक्षात राहावा म्हणून अनेक जण यासाठी प्लॅनिंग करतात. समुद्रकिनारी, तर कधी एखाद्या खास ठिकाणी जाऊन लग्नाची मागणी घालतात किंवा प्रपोज करतात. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणीने विमान प्रवासात तिच्या प्रियकराला लग्नासाठी प्रपोज केले आहे. कशाप्रकारे ही प्लॅनिंग करण्यात आली चला जाणून घेऊ…
व्हायरल व्हिडीओ ( Video) चंदीगडचा आहे. प्रेयसी व प्रियकर इंडिगोच्या फ्लाइटमधून प्रवास करणार असतात. प्रेयसी ऐश्वर्याला प्रियकर गोएल बरोबरच हा प्रवास आणखीन खास करण्याची कल्पना येते. पण, इंडिगो फ्लाइट यासाठी परवानगी देईल की नाही याची खात्री नव्हती. नंतर परवानगी घेऊन आणि काही मित्रांच्या मदतीने तिने एक खास सरप्राईज तिच्या प्रियकरासाठी आयोजित केले. केबिन कर्मचाऱ्यांकडे जाऊन तिने एक खास घोषणा केली आणि नक्की कशाप्रकारे तरुणीने लग्नासाठी प्रपोज केलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
हेही वाचा…“तेनु काला चष्मा…” साडी नेसून शिक्षिकेने धरला ठेका, VIDEO पाहून रॅपर बादशाहाही झाला फॅन
व्हिडीओ नक्की बघा…
तरुणीने घातली लग्नाची मागणी :
व्हायरल व्हिडीओत ( Video) तुम्ही पाहिलं असेल की, विमानात सर्व प्रवासी बसलेले असतात. तितक्यात प्रेयसी समोरून चालत येते. गुडघ्यावर बसते आणि बॉक्स उघडते. विमानात उपस्थित तिच्या काही मित्र-मैत्रिणी ‘ Will You Marry Me’ म्हणजेच माझ्याशी लग्न करशील का? असे मजकूर लिहिलेला वेगवेगळा कागद हातात धरून उभे राहतात आणि प्रियकर हो म्हंटल्यावर प्रेयसी बॉक्स उघडून त्यातील अंगठी प्रियकराच्या हातात घालते. त्यानंतर इंडिगोच्या फ्लाइटचे कर्मचारी त्यांच्या स्पेशल नाश्ता व एक खास नोट लिहून त्यांच्या सीटजवळ ठेवतात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ( Video) @shivamarora1812 @prabhakar__04 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये तरुणीने हा क्षण सविस्तर लिहिला आहे आणि इंडिगोच्या फ्लाइटच्या कर्मचाऱ्यांचे आभार देखील मानले आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहून प्रियकर व प्रेयसीला शुभेच्छा देताना व मुलगी जेव्हा प्रेमात पडते तेव्हा असंच प्रपोज करते असे कमेंटमध्ये म्हणताना दिसत आहेत. तसेच IngiGo 6E क्रू देखील या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले, त्यांनी जोडप्याला अभिनंदन करत लिहिले की: “देव तुम्हा दोघांना खूप प्रेम, आनंद आणि असंच एकत्रत राहण्याचा आशीर्वाद देवो.” ; अशी कमेंट केली आहे.