Video Shows Woman Pain Turns Into An Art : आपल्याला कधी कधी एकटे वाटले, राग आला, मनासारख्या गोष्टी घडल्या नाही की आपण दुसऱ्या गोष्टीत मन रमवण्यास सुरुवात करतो. मन रमवताना आपण कधी-कधी न केलेले किंवा कदाचित ही गोष्ट आपल्याला कधी जमलीच नसती, असे काम आपण करून मोकळे होतो आणि आपल्याला त्याच्यावर विश्वासच बसत नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये मनोरुग्णालयात राहणाऱ्या तरुणीच्या अनोख्या कलेचा उगम झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोफी पुचुलु (Sophie Puchulu) नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. त्यामध्ये काही स्टार्स दिसत आहेत. तर हे स्टार्स चक्क तिने स्वतःच्या हाताने बनवले आहेत. सोफीला एकेकाळी मनोरुग्णालयात ठेवले होते. त्यादरम्यान तिच्या अनोख्या हस्तकलेने तिला जगण्याचा नवीन आधार मिळाला. मानसिक रुग्णालयात ती १२ ते १६ तास पेपर फोल्ड करून पेपर स्टार्स (कागदाचे तारे) बनवायची. पेपर स्टार्स बनवणे हे तिला मानसिक समस्यांपासून सामना करण्याचे यंत्र ठरले. तरुणीने मनोरुग्णालयात बनवलेले पेपर स्टार्स व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

स्टार्स बनवणे सुरूच ठेवले…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही विविध रंगांचे पेपर स्टार्स बनवलेले पाहिले असतील. तरुणी व्हिडीओत सांगत आहे की, जेव्हा मनोरुग्णालयातून तिला आठवडाभरानंतर डिस्चार्ज मिळाला, तेव्हासुद्धा तिने पेपरपासून स्टार्स बनवणे सुरूच ठेवले. चक्क तिची बोटं दुखेपर्यंत तिने असंख्य पेपर स्टार्स बनवले आणि तिची कला दाखवत तिने सगळे पेपर स्टार्स एका बेडवर ओतले आणि याचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला. तिने तीन आठवड्यात एवढे छान पेपर स्टार्स बनवले आहेत की तुम्ही थक्क होऊन जाल आणि तिला हस्तकलेनी जगण्याची उभारी दिली असे म्हणाल.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @squishiesophie या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘माझा आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय व्हिडीओ’ अशी कॅप्शन तिने या व्हिडीओला दिली आहे. कारण यापूर्वी तिने हा व्हिडीओ टिकटॉकला पोस्ट केला होता. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा तरुणीच्या कलेचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत आणि तू हे स्टार्स कसे बनवलेस हे आम्हाला सांगशील का? असेसुद्धा आवर्जून विचारताना दिसून आले आहेत.