video shows youngsters carrying crocodile on scooter : मुसळधार पावसामुळे विश्वामित्री नदीला पूर आल्याने गुजरातच्या वडोदरामधील अनेक शहरांत पाणी साठले. त्यामुळे नदीतील अनेक मगरी रहिवासी भागात घुसल्या, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. निवासस्थानी व इतर ठिकाणी मगरी घुसल्याने वन विभागाचीदेखील धावपळ उडाली. एखाद्या व्यक्तीवर संकट आले की, आपण त्याच्या मदतीस धावून जातो. पण, येथे आज भारतीयांनी माणूस नाही, तर चक्क एका प्राण्याला मदत केली आहे आणि भारतात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असे आणखीन एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

शहरातील विविध भागांतून मगरींची सुटका करण्यासाठी वन विभाग सज्ज झाला आहे. वन विभाग दुसऱ्या ठिकाणी व्यग्र असल्याने, तरुणांनी सुमारे पाच फूट लांबीच्या मगरीची सुटका करून, तिला वन विभागाच्या कार्यालयात नेले आणि सरपटणाऱ्या प्राण्याला अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. पण, या तरुणांनी अगदी जोखीम पत्करून या मगरीला वन विभागाकडे सुपूर्द केले. कोणतीही मोठी गाडी किंवा ट्रक नाही तर कशा प्रकारे मगरीला वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले ते व्हायरल व्हिडीओतून ( Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा.

Massive tree falls in Ubud Monkey Forest in Bali kills two tourists tragic incident caught on camera
Bali: जंगलात फिरत होते पर्यटक, अचानक कोसळले भले मोठे वृक्ष; दोन पर्यटकांनी गमावला जीव, थरारक Video Viral
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
george soros loksatta editorial
अग्रलेख : ‘परदेशी हाता’चे भूत!
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज
snake entered tiger cage in British era Maharajbagh Zoo staff noticed it immediately and pulled snake out
वाघिणीच्या पिंजऱ्यात शिरला साप आणि आता मोराच्याही…

हेही वाचा…गुजरातमध्ये पूरग्रस्त भागात अन्न पोहोचवण्यासाठी तारेवरची कसरत; VIDEO तून पाहा डिलिव्हरी बॉयची मेहनत

व्हिडीओ नक्की बघा…

स्कूटरवरून वन विभागाकडे नेले…

व्हायरल व्हिडीओत ( Video ) तुम्ही पाहिलं असेल की, दोन तरुणांनी मगरीला वाचवून, स्कूटरवरून वन विभागाकडे नेले. एक तरुण स्कूटर चालवत होता आणि दुसरा तरुण मगर हातात घेऊन बसला आहे. पण, मगरीचे तोंड आदी दोरीने बांधून ठेवली आहेत; जेणेकरून ती कोणालाही हानी पोहोचवणार नाही. पण, तरुणांच्या या शौऱ्याने सर्वांनाच थक्क करून सोडले आहे आणि आजूबाजूचे प्रवास करणारे प्रवासी त्यांच्याकडे एकटक पाहताना दिसत आहेत. तरुणांच्या मागून येणाऱ्या एका अज्ञात प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला आणि पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ( Video) @umashankarsingh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, अशीही एक ट्रिपल रायडिंग! वडोदरात विश्वामित्री नदीतून बाहेर आलेल्या मगरीला दोन तरुण स्कूटरवरून वन विभागाच्या कार्यालयात घेऊन गेले, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. मगरीसोबत रायडर म्हणून बसलेल्या तरुणाने “IMA वडोदरा” असा टी-शर्ट घातला आहे ते पाहून एका युजरने कमेंट केली, “भारतात काहीही अशक्य नाही.”

Story img Loader