Video Shows Man Throws Money On Street : पैसे तर सगळेच कमावतात, पण पैसे कुठे आणि कशा पद्धतीने खर्च करावे याचे अनेकांना भान नसते. काही जण एकेक पैसे जोडून अगदी कष्टाने घरखर्च करत असतात. तर काही जण कोणतीही मेहनत न घेता, दुसऱ्यांच्या पैशांनी उपयोग स्वतःला हव्या त्या वस्तू घेण्यासाठी करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे . एका कन्टेन्ट क्रिएटरने प्रसिद्धीसाठी एक रील शूट केला आहे ; यामध्ये रस्त्याच्या मधोमध उभा राहून तो हवेत पैसे उडवताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (video) हैदराबादचा आहे. हैदराबादच्या कुकटपल्ली भागात रस्त्यावर नागरिकांची, तर गाड्यांचीही ये-जा सुरू आहे. पण, या सगळ्यात एका तरुणाने लक्ष वेधून घेतलं आहे. यूट्यूबर, इन्स्टाग्राम कन्टेंट क्रिएटर असणारा हा तरुण ट्रॅफिकमध्ये उभा असल्याचे दिसत आहे. बघता बघता तो काही पैसे भररस्त्यात उडवतो. हे पाहताच प्रवास करणारे नागरिक जागच्या जागी थांबले आणि आपल्या वाहनांवरून उतरून पैसे गोळा करू लागले. नक्की काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…मिरा रोडच्या बसस्टॉपचा ‘हा’ VIDEO तुम्ही पाहिलात का? ‘मुंबईचे डबेवाले’ थीमची ही सजावट पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

व्हिडीओ नक्की बघा…

पैसे घेण्यासाठी नागरिकांची धडपड :

हर्षा ऊर्फ ​​महादेव असे या व्यक्तीचे नाव आहे. व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, तरुण रील शूट करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभा राहून पैसे हवेत फेकतो. पैसे फेकले आहेत हे पाहून लोक बाईक आणि ऑटो-रिक्षातून उतरून पैसे गोळा करण्यासाठी धावपळ करत आहेत. तसेच यामुळे वाहतूकदेखील ठप्प झाली आहे. पण, तरुण पैसे हवेत फेकून निघून गेला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी केलेल्या या स्टंटचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध केला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @its_me_power___ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून या कन्टेंट क्रिएटरवर लोकांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून ‘हे पैसे खोटे आहेत’ असं म्हणत आहेत. तसेच एका युजरने शहर पोलिसांना टॅग करत म्हटले की, “कृपया कठोर कारवाई करा, जेणेकरून इतरांनी असे काही करण्याचा विचारही करू नये.” तर दुसऱ्या युजरने म्हटले की, यासाठी भविष्यात अशा प्रकारच्या मूर्ख कृती रोखण्यासाठी कन्टेंट क्रिएटरना शिस्त लावणे आवश्यक आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video shows youtuber instagram influencer throws money on road risks peoples lives for reels watch ones asp