Video Shows Zomato agent delivered food in knee deep water : गुजरातमध्ये दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे गुजरातमधील अनेक भाग पाण्यात बुडाले आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी लष्कराला बचावकार्यासाठी पाचारण करावे लागलेय. शाळा-महाविद्यालये बंद असून, पूरग्रस्त भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक झोमॅटो बॉय गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांना अन्न डिलिव्हरी करताना दिसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ (Video) अहमदाबादचा असून, पूरग्रस्त भागात एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय अन्न पोहोचवण्यासाठी आलेला दिसत आहे. अत्यंत मुसळधार पावसामुळे गुडघाभर पाणी साचलं आहे. रस्त्याच्या चारही बाजूंनी गाड्या पाण्यात बुडालेल्या दिसत आहेत. पण, अशी सर्व प्रतिकूल परिस्थिती असूनसुद्धा एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय आपलं कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर पडला आहे आणि अन्न डिलिव्हरी करतो आहे. एका अज्ञात व्यक्तीनं इमारतीच्या छतावरून हे पाहिलं आणि त्याबाबतचा व्हिडीओ शूट करून, तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नक्की बघा हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…फुटबॉल खेळण्यासाठी हट्ट करणाऱ्या हत्तीच्या पिल्लाचा VIDEO; रिमझिम पावसात आईच्या मागून कसं फिरतंय एकदा पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

डिलिव्हरी बॉयला बक्षीस द्या :

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ( Video) @vikunj1 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला “#ZOMATO अहमदाबादमध्ये अत्यंत मुसळधार पावसात डिलिव्हरी करीत आहे”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. एकूणच पुराने वेढलेल्या भागांतील रस्त्यांवरून अन्न पोहोचवणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. काही युजर्सनी झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांना डिलिव्हरी बॉयला त्याच्या उत्कृष्ट कामासाठी बक्षीस देण्याची विनंती केली आहे.

अन्न डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाला पाहून झोमॅटोच्या कस्टमर केअरच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलने या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे आणि हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल युजरचे आभार मानले. त्यांनी डिलिव्हरी बॉयचा ऑर्डर आयडी क्रमांकदेखील विचारला; जेणेकरून त्या डिलिव्हरी डिलिव्हरी बॉयची ओळख पटवणे सोपे होऊ शकेल. झोमॅटोने, “हाय विकुंज! आमच्या डिलिव्हरी पार्टनरच्या मेहनत व प्रयत्नांना हायलाइट केल्याबद्दल धन्यवाद! तो खरोखरच सुपरहीरोप्रमाणे अत्यंत प्रतिकूल हवामानाचा सामना करीत आला आहे”, अशी कमेंट केली आहे.