Video Shows customers surprise delivery Boy with birthday celebration : पावसाळा, उन्हाळा असो किंवा हिवाळा, झोमॅटो, स्विगीचे डिलिव्हरी बॉय अगदी वेळेत आपल्यापर्यंत वस्तू, अन्न पोहचवतात. अगदी एखाद्याचा वाढदिवस असेल आणि आपण ११ वाजता जरी केक ऑर्डर केला तरीही तो १२ च्या आधी आपल्यापर्यंत पोहचवला जातो. आपल्या वाढदिवसादिवशी अगदी प्रेमाने, मेहनतीने केक आणणाऱ्या या डिलिव्हरी बॉयचा वाढदिवस साजरा करण्याची संधी तुम्हाला मिळाली तर तुम्हाला आवडेल का? हो… तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ग्राहकांनी डिलिव्हरी बॉयचा वाढदिवस साजरा केला आहे.

अहमदाबादच्या मुसळधार पावसात एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय अन्न देण्यासाठी एका ग्राहकाच्या घरी जातो. पावसात घरोघरी डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीचा आज वाढदिवस असतो हे ग्राहकांच्या लक्षात येते. त्यामुळे ते डिलिव्हरी बॉयला सरप्राईज देण्याचा निर्णय घेतात. त्यावेळी घरात उपस्थित एक अज्ञात व्यक्ती या खास प्रसंगाचा व्हिडीओ शूट करून घेत असते. तेव्हा डिलिव्हरी बॉय ऑर्डरसह ग्राहकाच्या घरी पोहचतो. नक्की ग्राहकांकडून डिलिव्हरी बॉयला काय सरप्राईज मिळते, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video
a girl child shows humanity
संस्काराशिवाय आयुष्य काहीच नाही! चिमुकलीने दाखवली माणुसकी, वृद्धी व्यक्तीला पाजले पाणी, पाहा VIDEO VIRAL

हेही वाचा…‘अशी ही एक ट्रिपल रायडिंग!’ तरुणांनी थेट स्कूटरवरून नेलं मगरीला; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘भारतात काहीही…’

व्हिडीओ नक्की बघा…

हॅपी बर्थडे गाणं म्हणत आनंदाने केले स्वागत :

व्हायरल व्हिडीओत ( Video) तुम्ही पाहू शकता की, आकीब शेख असे या तरुणाचे नाव आहे. डिलिव्हरी बॉय ग्राहकाच्या घराबाहेर ऑर्डर घेऊन पोहचतो, तेव्हा ग्राहकाने त्याचे “हॅपी बर्थ डे” गाणं म्हणत आनंदाने स्वागत केले आणि त्याला एक छोटी भेटसुद्धा दिली आहे. हे पाहून डिलिव्हरी बॉयच्या चेहऱ्यावर हसू आले व तो अगदी मनापासून, सगळ्यांबरोबर हात मिळवून त्यांना धन्यवाद म्हणताना दिसला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) या @iimyashshah इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘तुम्हाला जमेल त्या मार्गाने इतरांना आनंद देत राहा. आम्हाला ही संधी मिळाली आणि या संधीसाठी झोमॅटोचे आभार’; अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे. हे पाहून झोमॅटोच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटने ‘इंटरनेटवरील सगळ्यात सुंदर व्हिडीओ’, अशी कमेंट केली व झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी हार्ट इमोजी टाकून कमेंट केली आहे. तसेच डिलिव्हरी बॉय आकीब शेख यांनीदेखील लिहिलं की, “खूप खूप धन्यवाद सर, हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडले आणि मला खूप छान वाटलं'”; अशी कमेंट केली आहे.

Story img Loader