Shocking video: सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.या व्हिडीओतून सकाळी घराबाहेर गेलेला व्यक्ती पु्न्हा घरी येईल की नाही याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.असाच एक व्हिडीओ समोर आलाय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. महिला मॉलमध्ये शॉपिंग करताना जमीन खचते. पुढे महिलेसोबत भयानक घडतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चीनमध्ये एका शॉपिंग सेंटरचा मजला अचानक कोसळल्याने एक महिला सिंकहोलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ मार्च रोजी घडलेली घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला मॉलमध्ये शॉपिंग करताना दिसत आहे. त्यावेळी अचानक ती उभी असलेला मजलाच कोसळतो. यामध्ये ती सुद्धा खाली पडते. यावेळी बाजूला असलेली आणखी एक महिला यातून थोडक्यात बचावते.

मिळालेल्या माहितीनुसार, खालच्या मजल्यावर काम करणारा एक बांधकाम कामगारही ढिगाऱ्याखाली अडकला होता. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. या अपघाताचे कारण म्हणजे, मॉल व्यवस्थापकाने खचलेल्या स्लॅपकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाला आहे. अधिकाऱ्यांनी याचा तपास सुरु केला असून इमारत आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या देखभालीमधील मोठ्या सुरक्षा त्रुटी समोर आल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral poster: मित्राला होती गर्लफ्रेंडची कमी! बेस्ट फ्रेंडनं चौकाचौकात होर्डिंग लावत सुरु केली शोधमोहीम

मॉलचे मालक हुआंग यांनी सांगितले की, या अपघातात दोघेही जखमी झाले आहेत परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे. श्री हुआंग यांच्या म्हणण्यानुसार बांधकाम कामगाराच्या पायाला पडलेल्या ढिगाऱ्यामुळे दुखापत झाली, तर दुकानदाराला फ्रॅक्चर झाले. पुढे त्यांनी “ते आमचे ग्राहक असल्याने, त्यांची जबाबदार आमची आहे, असं म्हंटलंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. 