Cat Saves Baby From Falling: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओजमध्ये तुम्हाला अनेकदा डोळ्यावर विश्वास बसणार नाही असे काही क्षण पाहायला मिळतात. दुसरीकडे, प्राण्यांचे व्हिडीओ पाहून अनेकांना दिवसभरातील त्रास, थकवा, ताण विसरता येतो. मात्र आज जो व्हिडीओ आपण पाहणार आहोत तो या दोन्हीचा एक सुंदर संगम आहे. यामध्ये चक्क एका मांजरीने बाळाचा जीव वाचवला आहे. सीसीटीव्ही मध्ये जर ही घटना कैद झाली नसती तर कदाचित आपण यावर विश्वासही ठेवला नसता. प्राण्यांना माणसापेक्षा अधिक अक्कल असते असे काही जण मस्करीत म्हणतात पण आजचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हे म्हणणं पटेल असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
तुम्ही व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की एका खोलीत एक बाळ व एक मांजर दोघेच आहेत. यात बाळाचे पालक दिसत नाहीत. काही सेकंदात बाळ रांगू लागते. खोलीच्या एका बाजूला जिना आहे. व्हिडिओतील बाळ जेव्हा त्या जिन्याच्या दिशेने रांगू लागते तेव्हा अचानक मांजर खुर्चीवरून उडी मारून त्या बाळाच्या दिशेने येते. जिन्यावर उभं राहून मांजर दोन्ही हात वर करून त्या बाळाला धरते आणि मागे ढकलू लागते. बाळ सुरुवातीला ऐकत नाही पण मग पुढे काय होते हे आपण व्हिडीओमध्येच पाहूया…
Video: मांजरीने बाळाचा जीव वाचवला
हे ही वाचा<< अमेरिकन मुलांनी रामायणाचं गीत गायल्याचा Video व्हायरल; मोदींनाही केलं टॅग पण.. खरी क्लिप बघून व्हाल थक्क
सध्या प्राप्त माहितीनुसार हा व्हिडीओ २०१९ चा असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना कोलंबियामधील असल्याचे सुद्धा काहींनी सांगितले आहे.या व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी मांजरीच्या हुशारीचे कौतुक केले आहे. काहींनी पालकांच्या बेजबाबदारीवर सुद्धा टीका केली आहे. अनेकदा मांजरींना रागीट आणि धूर्त म्हंटल जातं पण हा व्हिडीओ मांजरीचे गोड रूप दाखवतोय असं म्हणत मांजरप्रेमींनी सुद्धा यावर कमेंट केल्या आहेत. तुम्हाला ही हुषार मांजर कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.