Viral Video Today: वाहनांची सदैव गर्दी होणाऱ्या रस्त्यांच्या कडेला मोठमोठ्या जाहिरातींचे फलक लावण्यावरून याआधीही अनेकदा टीका झाली आहे. वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन या जाहिरातींच्या फलकांकडे जाऊ शकते परिणामी अपघातांचा धोका बळावतो असा या टीकेमागचा हेतू आहे. एखाद्या वेळेस पाईपच्या, टीव्हीच्या जाहिरातीकडे लोक दुर्लक्ष करतीलही पण सुंदर अभिनेत्रीचा फोटो वैगरे असलेली जाहिरात पाहिली जातेच. बरं हे ही बाजूला ठेवू पण समजा तुम्ही गाडी चालवताय आणि अचानक Smoke Weed Every Day असं लिहिलेलं दिसलं तर?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील हाजी अली येथील रस्त्यावर अलीकडेच असा एक डिस्प्ले बोर्ड झळकलेला पाहायला मिळाला. अक्षत देवरा या सोशल मीडिया वापरकर्त्याने डिस्प्ले बोर्डचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हाजी अली दर्गा रस्त्यावर एलईडी बोर्ड लावला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “हाजी अली, मुंबई – डायव्हर्शन साइन “स्मोक वीड एव्हरी डे.”

‘Smoke Weed Every Day’ व्हायरल व्हिडीओ

ट्विटरवर २० डिसेंबरला पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १६०० हुन अधिक व्ह्यूज आणि लाईक्स आहेत. या व्हिडिओवर कमेंटसमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करण्यात आले आहे.

एल अँड टी कंपनीने हाजी अली ते लोटस जंक्शनपर्यंत उत्तरेकडे वळवण्यासाठी एलईडी डिस्प्ले बोर्ड लावले होते. या संदर्भात एल अँड टीने इंडिया टुडे लामाहिती देत सांगितले की काल रात्री काही तांत्रिक बिघाडामुळे चुकीचा संदेश गेला होता. यासंदर्भात आयटी टीमशी संपर्क साधला आहे आणि डिस्प्ले बोर्ड चूक सुधारून होईपर्यंत बंद करण्यात आला आहे”.

हे ही वाचा<< नितीन गडकरी यांनी ताज हॉटेलमध्ये शेफला पगार विचारला; म्हणतात, “रोज संध्याकाळी ७ नंतर मी..”

दरम्यान, गांजा हा एक सायकोएक्टिव्ह औषध आहे आणि गांज्याचे सेवन किंवा विक्री भारतात बेकायदेशीर आहे. मादक द्रव्ये आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा 1985 च्या तरतुदींनुसार अगदी कमी प्रमाणात गांजा बाळगल्यास सुद्धा व्यक्तीला अटक होऊ शकते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video smoke weed every day displayed on led in mumbai haji ali netizens target cm eknath shinde in comments svs