जंगलात जिवंत राहायचं असेल तर संघर्ष हा पाचवीलाचा पुजलेला असतो. इथे मिनिटा मिनिटांला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमधून जंगलातला हा भयानक संघर्ष समोर येतो. पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा पण व्हिडिओ बघायाचं म्हणजे मन घट्ट करावं लागेल. ख्रिस्तोफर रेनॉल्ड याने हा व्हिडिओ सोशल युट्यूबवर अपलोड केलाय. आपल्या पत्नीसोबत परतत असताना त्याने जे काही पाहिलं त्याचा त्याला जबर धक्काच बसला. काळ्या रंगाच्या एका मोठ्या सापाने आपल्यापेक्षा कमी आकाराच्या सापाला त्याच्यासमोर गिळलं. आता जंगलात सापाच्या अनेक प्रजाती आहेत ज्या इतर सापांना ठार करतात तेव्हा जंगलात असं चित्र पाहायला मिळणं नवल नाही. पण त्यानंतर पुढे ख्रिस्तोफरने जे काही पाहिलं त्यावर त्याला विश्वासच बसत नव्हता. सापाने गिळल्याबरोबर तो छोटा साप ठार झालाय असंच त्याला वाटलं पण अगदी काही मिनिटांत लहान आकाराचा साप मृत्यूच्या जबड्यातून जिवंत तेही अगदी सुखरूप बाहेर आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा